sant tukaram beej sohala in dehu  saam tv
मुंबई/पुणे

Sant Tukaram Beej 2024 : श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त देहूत लाखाे भाविक दाखल, मावळातील ओवळेतून दिंडीचे प्रस्थान

Dehu Marathi News : दिंडीचे ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी जागोजागी वारकऱ्यांसाठी अल्पोहार फल आहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

दिलीप कांबळे

Dehu :

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 375 वा सदेह वैकुंठगमन सोहळा म्हणजेच बीजसोहळा (Sant Tukaram Beej) आज (बुधवार) देहू नगरीत होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर देहू मधील मुख्य मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. लाखो देशी विदेशी फुलांचा वापर करून ही सजावट संपूर्ण देहू मधील मंदिरात करण्यात आली आहे. या मंदिर परिसरात संत तुकाराम महाराज यांचे फुलांनी तयार चित्र देखील तयार करण्यात आले आहे. (Maharashtra News)

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या 376 व्या बीज सोहळा निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून हजारो दिंड्या देहू मध्ये दाखल होत असतात. बीज सोहळ्यानिमित्ताने पवन मावळ दिंडी समाजाच्या वतीने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. दिंडीची ओवळे येथून देहूकडे प्रस्थान झाले आहे.

कोहळे येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिरामध्ये वीणा पूजन करून दिंडीचे देहुकडे प्रस्थान ठेवले आहे. या दिंडी मध्ये दीवड,अडले बुद्रुक, अडले खुर्द, पुसाणे, पाचाने, कुसगाव, सांगवडे, व इतर गावातील शेतकरी वारकरी सहभागी झाले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिंडीचे ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी जागोजागी वारकऱ्यांसाठी अल्पोहार फल आहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

Politics: 'केम छो शिंदेसाहेब..' जय गुजरातच्या घोषणेवर एकनाथ शिंदेंवर टीकेचा पाऊस, राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारानं डिवचलं

SCROLL FOR NEXT