Sanjay Raut Saam Tv
मुंबई/पुणे

संजय राऊत यांच्यानंतर पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले

खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे (ShivSena) खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ सुरू असताना आता त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी ईडी वर्षा राऊत यांची चौकशी करणार आहे.

शुक्रवार,५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ईडीने वर्षा राऊत यांना चौकशीसाठी बोलावले आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ईडीने विशेष न्यायालयाकडे राऊत यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती, न्यायालयाने मान्य केली आहे. न्यायालयाने राऊत यांच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे.

मुंबईतील पत्राचाळीच्या पुनर्विकासातील कथित अनियमिततेशी संबंधित एका प्रकरणात ईडीने ३१ जुलैच्या रात्री संजय राऊत यांना अटक केली होती.

ईडीने १ ऑगस्ट रोजी संजय राऊत यांना विशेष पीएमएलए न्यायालयात हजर केले होते, आणि ८ दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, न्यायमूर्तींनी बचाव पक्ष आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आठ दिवसांच्या कोठडीची आवश्यकता नसल्याचे सांगितले होते. त्यांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली होती.

आज कोठडी संपल्यानंतर ईडीने (ED) संजय राऊत यांना न्यायालयात हजर केले आणि संजय राऊत यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. न्यायालयाने संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यातून झालेल्या व्यवहाराप्रकरणी ईडीने माहिती दिली. 'आम्हाला काही कागदपत्रे मिळाली आहेत, ज्यामध्ये अनेक खुलासे झाले आहेत. कागदपत्रांवरून मनी लॉड्रिंगची माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान आणखी १.१७ कोटीचे प्रकरण समोर आल्याचे ईडीने सांगितले आहे. याअगोदर १.०६ कोटींच्या व्यवहारांचीही माहिती मिळाली होती. बँक खाते तपासल्यानंतर काही अज्ञातांनी वर्षा राऊत यांना पैसे दिल्याचे आढळून आले आहे, असंही ईडीने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac Sign Lucky Colour: कोणत्या राशीसाठी कोणता रंग शुभ? तुमच्या आयुष्यात होईल भरभराट

Virar: विरारमध्ये सूर्या धरणाची मुख्य पाईपलाईन फुटली, ३० ते ४० फूट उंच पाण्याचे फवारे उडाले; VIDEO व्हायरल

Pineapple Sheera Recipe: सकाळचा नाश्तासाठी झटपट करा टेस्टी पायनॅपल शिरा, लहान मुलांपासून सगळे घरातले होतील खूश

Nalasopara: गटारावरील लोखंडी जाळीत महिलेचा पाय अडकला, जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल; VIDEO

Top 10 Diamonds: जगातले सर्वात मोठे TOP 10 हिरे कोणते? तुम्हाला ही माहितीये का?

SCROLL FOR NEXT