Sanjay Raut Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut : जय महाराष्ट्र ! ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांचं सलग दुसरं ट्विट

संजय राऊतांनी दुसऱ्या ट्विटमध्ये 'जय महाराष्ट्र' असं नमूद केलं असून, यातून त्यांनी सूचक इशारा दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : अलिबाग आणि मुंबईतील दादर येथील मालमत्तांवर ईडीने टाच आणल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देतानाच, भाजपवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर काही वेळानेच त्यांनी 'असत्यमेव जयते' असं ट्विट (Tweet) केलं होतं. या ट्विटला चार तास उलटत नाही तोच, राऊत यांनी दुसरं ट्विट केलं आहे. 'जय महाराष्ट्र' असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं असून, एका शायरीद्वारे त्यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला आहे.

ईडीच्या कारवायांवर शंका उपस्थित करून आरोपांच्या फैरी झाडणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरच आज, मंगळवारी ईडीने मोठी कारवाई केली. त्यांच्या अलिबागमधील मालमत्ता आणि मुंबईच्या दादरमधील फ्लॅटवर जप्तीची कारवाई केली. या कारवाईनंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. मनी लाँड्रिंगमधील एक रुपया जरी खात्यात आला असेल तर, माझी सर्व मालमत्ता भाजपला दान करेन, असं थेट आव्हानच त्यांनी दिलं होतं. त्यानंतर काही वेळातच त्यांनी ट्विट केलं होतं. यात त्यांनी 'असत्यमेव जयते' असं नमूद केलं होतं.

संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या. महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांनी भाजपवर (BJP) टीकास्त्र सोडलं होतं. तर, भाजपच्या काही नेत्यांनी ईडीच्या कारवाईचं स्वागत करतानाच, राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. आता पुन्हा त्यांनी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी 'जय महाराष्ट्र' असं नमूद केलं असून, यातून त्यांनी सूचक इशारा दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GT vs MI: अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळाला; तिलक आणि अश्विनीनं गुजरातचा धुव्वा उडवला

IAS Transferred : २४ IAS अधिकाऱ्यांसह १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या, युपीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

अमेरिका-इराण युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकेच्या कुरापतीमुळे इराणचा संताप

SCROLL FOR NEXT