Sanjay Raut Vs Bharat Gogawale  saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut News : लोकसभेआधीच महाराष्ट्रात धुरळा! शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रमुख नेत्याचं संजय राऊतांना थेट चॅलेंज

Sanjay Raut Vs Bharat Gogawale Politics : लोकसभा निवडणुकांना अद्याप अवकाश आहे. त्यापूर्वीच महाराष्ट्रात राजकीय धुरळा उडाला आहे.

Nandkumar Joshi

सूरज सावंत, मुंबई

Sanjay Raut Vs Bharat Gogawale Politics : लोकसभा निवडणुकांना अद्याप अवकाश आहे. त्यापूर्वीच महाराष्ट्रात राजकीय धुरळा उडाला आहे. निमित्त संजय राऊत. ते लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आणि राजकीय नेत्यांकडून आव्हान-प्रतिआव्हान देण्यास सुरुवात झाली. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) प्रतोद भरत गोगावले यांनी थेट संजय राऊत यांना चॅलेंज दिलं आहे. (Maharashtra Political News)

संजय राऊत (Sanjay Raut) हे लोकसभेच्या ईशान्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक मैदानात उतरणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख नेते भरत गोगावले यांनी राऊतांना थेट आव्हान दिले आहे.

'संजय राऊत (Sanjay Raut News In Marathi) निवडणूक लढणार आहेत ही चांगली बाब आहे. काही जणांचे खायचे दात आणि दाखवायचे दात हे वेगळे असतात. तुमच्यासमोर बोलायला त्यांना काही वाटत नाही; पण त्यांनी निवडणुकीला उभे राहून दाखवावेच,' असं गोगावले म्हणाले.

ईशान्य मुंबई किंवा इतर कुठूनही त्यांनी उभे राहून दाखवावे. काय करायचं आणि काय नाही करायचं हे लोकांना चांगलं माहीत आहे. २०२४ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections 2024) फार काही लांब नाही. सात-आठ महिनेच राहिलेले आहेत. घोडामैदान लांब नाही. संजय राऊत यांनी तयारी करावी. शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) युती करतो. मग 'दूध का दूध पानी का पानी' त्यांना दाखवतो, असं आव्हानही त्यांनी दिले.

रायगडचा प्लान सांगितला!

अनंत गीते याच्या आधीच्या निवडणुकीत काठावर पास झाले होते. त्यानंतरच्या निवडणुकीत ३० ते ३२ हजार मतांच्या फरकाने ते पडले. मग जर आता आम्ही तीन पक्ष एकत्र आलोत, तर किती मतांच्या फरकाने पडतील हे आता तरी सांगू शकत नाही. पण त्यांनी त्यांची तयारी करावी. आम्ही त्यांचे आव्हान स्वीकारतो. आमच्याकडं जो कोणी उमेदवार उभा राहील, मग ते तटकरे असो की अन्य कोणी? त्याला निवडून आणण्याचे काम आम्ही सर्व करू, असे गोगावले म्हणाले.

आम्हाला वॉशिंग मशीनमध्ये टाका किंवा कुठेही? फरक पडत नाही!

उद्धव ठाकरे यांच्या टीकेला गोगावले यांनी उत्तर दिले. आम्हाला वॉशिंग मशीनमध्ये धुण्याचा अर्थ काय? मुंबईत तर आमचं घर नाही. आम्हाला वॉशिंग मशीनमध्ये टाका किंवा अन्य कुठे टाका? आम्हाला फरक पडणार नाही. रायगडमधील आमच्या शिवसेनेच्या तीन जागा, भाजपच्या तीन जागा; त्याचबरोबर लोकसभेच्या दोन जागा आम्ही निवडून आणून दाखवू, असा विश्वास गोगावले यांनी व्यक्त केला. त्यापूर्वी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीतच आम्ही दूध का दूध आणि पानी का पानी करून दाखवू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

२४ तास लोकांसाठी काम करणारा मुख्यमंत्री याआधी पाहिलात का?

मुख्यमंत्री शिंदे हे सर्वसामान्यांसाठी, गोरगरिबांसाठी काम करतात. २४ तास जनतेसाठी काम करणारा मुख्यमंत्री आपण यापूर्वी कधी पाहिला होतात का? असा सवाल त्यांनी विरोधकांना विचारला.

सगळ्या आवाहनांना शिंदे हे स्वतः सामोरे जात आहेत. जे अडचणीत येत आहेत, त्यांना देखील स्वतः मदत करत आहेत. जर कुठली दुर्घटना घडली तरी ते स्वतः जाऊन तिथे पाहणी करतात. आढावा घेतात, असंही त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत आहेत. हीच बाब त्यांना खूपते आहे का? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. कारण आधीच्या मुख्यमंत्र्यांनी असं कधीही काम केलं नव्हतं. हे आता त्यांना बहुधा जाणवत असावं. मुख्यमंत्री जर असेच काम करत राहिले तर, पुढे येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये त्यांना 'जय महाराष्ट्र' करावा लागेल असे त्यांना वाटत असावे, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: परळीत ५० हजार मतांनी धनंजय मुंडे आघाडीवर

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

IND vs AUS 1st Test: लाईव्ह सामन्यात हर्षित राणा अन् मिचेल स्टार्क भिडले! नेमकं काय घडलं? -VIDEO

Vidhan Sabha Election Results : सुरुवातीच्या कलात भाजपने गाठलं शतक!

SCROLL FOR NEXT