Sanjay Raut Saam Tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut: सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवादानंतर संजय राऊतांचे मोठे विधान, म्हणाले; 'शिवसेना ही…'

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर मागील तीन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. याप्रकरणी आता युक्तिवाद पूर्ण झाला असून हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे राहणार की सात न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर जाणार? यावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे.

दरम्यान, यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदास संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत..

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी ”सर्वोच्च न्यायालयात आमच्या वकिलांनी ठामपणे बाजू मांडली. आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. अजूनही या देशात न्याय जिवंत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सदसदविवेकबुद्धीवर आमचा विश्वास आहे. रामशास्री बाण्याचे न्यायमूर्ती या व्यवस्थेत आहेत, म्हणून न्यायालय जिवंत आहे.अशी प्रतिक्रिया दिली आहे.

त्याचबरोबर पुढे बोलताना शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. हेच या महाराष्ट्राचं सत्य आहे आणि या सत्याचा विजय नक्कीच होईल असा विश्वासही संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

निवडणूक लढवण्यास तयार....

त्याचबरोबर "शिवसेना कोणाची याचा निर्णय जनता घेईल, उद्या जरी न्यायालयाने निवडणुका लढण्याचा आदेश दिला तरी आम्ही लढायला तयार आहोत, हा निकाल भविष्यासाठी महत्वाचा आहे," असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

भाजपवर साधला निशाणा..

त्याचबरोबर यावेळी बोलताना संजय राऊत यांनी भाजवर निशाणा साधला. ज्यामध्ये त्यांनी "भारतीय जनता पक्षाचे आणि फुटीर गटाचे लोक सांगतायत निकाल आमच्या बाजूने लागणार, हा आत्मविश्वास येतो कुठून?" असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, यावेळी संजय राऊत यांनी "गल्लोगल्ली शिवजयंती साजरी ही शिवसेनेकडून केले जाते भाजपला आता आठवण झाली आहे, निवडणुक आली स्वार्थ आला तर त्यांना महाराज आठवतात," अशी टीकाही भाजपवर (BJP) केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेडच्या देगलूरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

Gokul Election 2026: सतेज पाटलांनी विरोधकांना दाखवलं आस्मान; वाचा विजयी उमेदवरांची यादी

Skin Care : नाकावर ब्लॅकहेड्स वाढले आहेत? जाणून घ्या घरच्या घरी करता येणारे ७ सोपे उपाय

Tuesday Horoscope : दसऱ्याचा दिवस शुभ ठरणार, मोठे अडथळे दूर अन् काहींना होणार धनलाभ; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

FDAची मोठी कारवाई; ऐन सणासुदीच्या काळात पुण्यात १० टन पनीर, खवा जप्त

SCROLL FOR NEXT