Sanjay Raut  Saam Tv
मुंबई/पुणे

संजय राऊत यांनी माफी मागावी, अन्यथा...; BJP नेत्याचा इशारा

'संजय राऊतांनी न्यायालयाचा अपमान केला आहे त्यांनी माफी मागितली नाही तर च्यांच्यावरती न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी याचिका दाखल करु'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) न्यायालयाचा अपमान केला आहे त्यांनी माफी मागितली नाही तर च्यांच्यावरती न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी याचिका दाखल करु असा इशारा आता भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी दिला आहे. आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्यात अटकेची टांगती तलवार असल्याने किरीट सोमय्या हे काही दिवस गायब होते. मात्र. त्यांना जामीन मिळताच ते पुन्हा मुंबईत आले.

किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) जामीन मिळताच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या या एक ट्विट करत कोर्टाच्या निर्णयाविरोधात 'दिलासा घोटाळा हा न्याय व्यवस्थेला अलीकडेच लागलेला डाग आहे.' अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यांच्या याच प्रतिक्रियेवरती आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राऊतांनी न्यायालयाचा अपमान केला आहे त्यांनी माफी मागितली नाही तर च्यांच्यावरती न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी याचिका दाखल करु असा इशारा दिला आहे. तसंच संजय राऊत यांना धनंजय मुंडे, प्रताप सरनाईक, मंदाकिनी खडसे यांना न्यायालयाने दिलासा दिला हे दिसत नाही का असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, भातखळकर यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज केलेल्या १४ ट्विटवर प्रतिक्रिया दिली ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी आज एका पाठोपाठ एक असे १४ ट्विट करत शरद पवार यांची पोलखोल केली आहे. वैचारिक आणि राजकीय कोलांट्या उद्या शरद पवार जातीयवादासाठी आणि मतांसाठी कशा मारतात हे देवेंद्र फडणवीस यांनी पुराव्यासह मांडले आहे. माझे शरद पवार यांना आव्हान आहे त्यांनी पुराव्यासह याला उत्तर द्यावे पण पवार ते करणार नाहीत कारण त्यांच्याकडे पुरावे नाहीत अशी खोचत टीप्पणी देखील त्यांनी यावेळी केली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Shivaji Maharaj History: लूट करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत हेच शहर का निवडलं?

सुखी संसाराच्या स्वप्नांची क्षणांत राखरांगोळी; १० दिवसांपूर्वी लग्न झालेल्या पती-पत्नीचा अपघातात मृत्यू

Maharashtra News Live Update: खर्डी – उंबरमळी स्टेशनमध्ये रुळाजवळील कोरड्या गवताला आग

Crime News: सूनेने सासऱ्याचा प्रायव्हेट पार्ट ठेचला; गंभीर दुखापतीमुळे जागीच मृत्यू, कशावरून इतका टोकाचा वाद झाला?

Firecracker Blast : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT