Sanjay Raut News SAAM TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut : 'लाज वाटली पाहीजे...'; महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुरु असलेल्या कारवाईवरुन संजय राऊतांची टीका

Political News : लाज वाटली पाहिजे तुम्हाला किशोरी पेडणेकर यांना तुम्ही बोलत आहात. मुंबईच्या माजी महापौर यांना चार-पाच लाखाच्या व्यवहारासाठी कसला हिशोब करत आहात, असा सवालही संजय राऊत यांनी विचारला.

प्रविण वाकचौरे

Sanjay Raut :

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर, रविंद्र वायकर, संदीप राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. ईडीच्या या कारवाईवरुन ठाकरे गटाने खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे सरकारवर सडकून टीका केली आहे. कितीही नोटीसा पाठवा, नोटीसांना घाबरत नाही. तुमच्या समोर गुडघे टेकणार नाही, असं संजय राऊत यांनी ठणकावलं.

रोहित पवार यांना काल 11 तास बसवलं. आज किशोरी पेडणेकर यांना बोलवलं आहे. रवींद्र वायकर यांना देखील नोटीस काढली आहे. यांचे लोक देशाला बुडवून पळून गेले, त्यांच्यावरती कोणाचं लक्ष नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

लाज वाटली पाहिजे तुम्हाला किशोरी पेडणेकर यांना तुम्ही बोलत आहात. मुंबईच्या माजी महापौर यांना चार-पाच लाखाच्या व्यवहारासाठी कसला हिशोब करत आहात, असा सवालही संजय राऊत यांनी विचारला.

मराठी माणसाच्या तिजोरीवर दरोडा

सरकार मुंबईवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न आहे. शिवसेनेच्या राजवटीमध्ये मुंबई महानगरपालिका श्रीमंत होती. लोकांच्या पैशाला एक संरक्षण होतं. पण सरकार आणि प्रशासनाचा कारभार यामुळे आमच्या या मराठी माणसाच्या तिजोरावर दरोडा टाकत आहे. सरळ सरळ लूट सुरु आहे आणि त्या संदर्भात चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI चा मोठा निर्णय! आता या खातेधारकांसाठी डिजिटल सेवा सुरु; कोट्यवधी ग्राहकांना होणार फायदा

Maharashtra Dasara Melava Live Update : महात्मा गांधी यांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अतुलनीय - भागवत

Governemnt Job: बेरोजगारांना मोठा दिलासा! १० हजार ३०९ जणांना शासकीय नोकरी | VIDEO

Maharashtra Rain : राज्यात मान्सूनला निरोप कधी? परतीच्या पावसाची तारीख आली समोर

Maggi Recipe : पहाडी-स्टाइल चटकदार मॅगी घरीच १० मिनिटांत बनेल, फक्त फॉलो करा 'ही' रेसिपी

SCROLL FOR NEXT