sanjay raut  Saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut: नाशिकच्या काळाराम मंदिरात PM मोदींकडून साफसफाई, संजय राऊत म्हणाले, याची खरंच गरज होती का?

Sanjay Raut on Narendra modi cleans Temple : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या साफसफाईवरून संजय राऊतांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. नाशिकच्या काळाराम मंदिरात साफसफाईची गरज होती का, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

Vishal Gangurde

Sanjay Raut on Narendra modi cleans Temple :

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट दिली. नाशिकच्या प्राचीन काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर परिसराची स्वच्छता केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या साफसफाईवरून संजय राऊतांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. नाशिकच्या काळाराम मंदिरात साफसफाईची गरज होती का, असा सवाल ठाकरे गटाचे नेते , खासदार संजय राऊत यांनी केला आहे. (Latest Marathi News)

संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं की, 'आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काळाराम मंदिर दौरा केला. पंतप्रधान येणार म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम खाते 5 दिवसापासून साफ सफाई करत होते. त्यांनी मंदिर एकदम चकाचक केले. या कामासाठी 8 ते 10 लाख खर्च केले'.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'मंदिर ट्रस्टने देखील सफाई वर 2 ते 4 लाख खर्च केल्याचे समजते. अनेक ठिकाणी फरशीवर लाल गालिचे टाकले होते. तरीही आपल्या पंतप्रधान महोदयांनी हाती MOP घेऊन सफाई दर्शन केलेच! याची खरंच गरज होती काय? याचा अर्थ असा की सरकारने सफाई वर खर्च केलेले 10 12 लाख रुपये वाया गेले, असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT