sanjay raut Saam Tv
मुंबई/पुणे

'भागवतांनी माेर्चाचे नेतृत्व करावे, माेदी, शहांना जाब विचारावा'

हा सर्व खेळ सुरु आहे महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा आणि देशात हिंसाचार घडविण्याचा अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली.

जयश्री मोरे

मुंबई : महाराष्ट्रात हिंसाचार आणि दंगली घडविण्याची ताकद रझाकदमीकडे नाही. रझाकदमीने एकेकाळी लाेकांची डाेकी भडकवली आहेत. परंतु त्यांच्यावर आता सरकारने नियंत्रण आणले आहे. त्यामुळे त्रिपुरातील घटनेचे पडसाद महाराष्ट्रात का उमटावेत हा प्रश्न पडला आहे. बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, दिल्लीत, मध्यप्रदेशात का नाही फक्त महाराष्ट्रातच का? त्यामुळे या मागे माेठे कारस्थान असल्या सारखे वाटत आहे असे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी नमूद केले. sanjay raut tripura maharashtra violence mohan bhagwat delhi

संजय राऊत म्हणाले काश्मीरात हिंदू पंडिताना मारले जाते आहे. त्या विरोधात कोणी माेर्चे, आंदोलन का करीत नाही. मणिपूरात एक कर्नल आणि त्यांच्या कुटुंबियांनी मारले गेले. या विरोधात दिल्लीत आंदोलन झाले पाहिजे असे आम्हांला वाटते. हिंदू पंडितांना मारणा-यांच्या विराेधात, जवानांच्या हत्ये विराेधात दिल्लीत राष्ट्रवादी, हिंदूत्वादी संघटनांनी एकत्र येऊन माेर्चा काढला पाहिजे. त्याचे नेतृत्व सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले पाहिजे. ते करणार आहेत का असा प्रश्न राऊत यांनी विचारला आहे. हिंदूच्या बाबतीत आपल्या देशात काय चालले आहे याचा जाब विचारा माेदींना, शहांना असे राऊत यांनी नमूद केले. महाराष्ट्रात रझाकदमी जर म्हणत असेल आम्ही नाही केलं तर मग कोणी केलं हा प्रश्न उपस्थित हाेताे.

विराेधी पक्ष नेते म्हणतात त्रिपुरामध्ये काही घडलंच नाही. मग माेर्चे आणि आंदाेलन का घडताहेत. हे सर्व महाराष्ट्रला अस्थिर करण्याचा आणि तणाव निर्माण करायचा डाव आहे असे राऊत यांनी नमूद केले. हा सर्व खेळ सुरु आहे महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा आणि देशात हिंसाचार घडविण्याचा अशी टिप्पणी राऊत यांनी केली.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातल्या ४ मतदारसंघात भाजप आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT