Narendra Modi Sanjay Raut SaamTV
मुंबई/पुणे

त्या शेतकरी कुटुंबांना PM केअर फंडाची मदत द्या : संजय राऊत

पंतप्रधान सहहदयी आहेत ते निश्चित मदत करतील अशी खात्री असल्याचे संजय राऊत यांनी नमूद केले.

जयश्री मोरे

मुंबई : तीन कृषी कायद्यांविराेधात देशासह विदेशात आंदाेलन झाले. त्यातून एेतिहासिक विजय झाला. या आंदाेलनकाळात ज्या शेतक-यांच्या कुटुंबाची वाताहात झाली त्या कुटुंबांना केंद्र सरकारने पीएम केअर फंड (PM Care Fund) यामधून मदत झाली पाहिजे, ही मागणी रास्त असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी नमूद केले.

संजय राऊत म्हणाले गेल्या दीड वर्षात सातशेच्या आसपास शेतकरी आंदाेलन स्थळी मारले गेले. काहींनी आत्महत्या केल्या. सरकारच्या गाेळीबारात, लखमीपूरला शेतक-यांना चिरडून मारले गेले. शेतक-यांच्या एकजूटीमुळे सरकारने विशेषत: पंतप्रधान नरेंद्र माेदींनी (narendra modi) हे कायदे मागे घेतले.

या सर्व शेतक-यांची कुटुंब उघड्यावर पडली आहेत. या शेतक-यांना मदत करावी अशी मागणी हाेत असेल तर गैर नाही. पीएम केअर फंडमध्ये अमर्याद पैसे पडले आहेत. बेहिशाेबी पैसे पडले आहेत. केवळ शेतक-यांची माफी मागून चालणार नाही. त्या सातशे कुटुंबांना आधार देणे गरजेचे आहे. पंतप्रधान सहहदयी आहेत ते निश्चित मदत करतील अशी खात्री असल्याचे संजय राऊत यांनी नमूद केले.

संप मिटण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांनी पुकारलेला संप मिटावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. मंत्री अनिल परब हे दिवस-रात्र बैठका घेत आहेत. मार्ग काढत आहेत. प्रयत्न करत आहेत. परंतु काही संघटना किंवा काही राजकीय पक्ष आडमुठेपणाने वागत असतील तर त्यातून अडथळे निर्माण होताहेत हे लक्षात घेतलं पाहिजे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, वहिनीनं दीराला ऊसाच्या शेतात बोलावलं; रागाच्या भरात गुप्तांग कापलं, धक्कादायक कारण

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

Thalapathy vijay To be a next CM : शेवटी 'विजय' झालाच! थलापती होणार तमिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री, दिवसभरात काय काय घडलं?

Ruchak Yog: 11 मे रोजी मंगळाच्या गोचरने बनणार रूचक राजयोग; या ३ राशी अचानक होणार गडगंज श्रीमंत

SCROLL FOR NEXT