Sanjay Raut Saam Tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी! संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम दाखल

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचे (ED)पथक दाखल झाले आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होणार असल्याचे सांगितले जात आहे. ईडीचे काही अधिकारी आज सकाळीच राऊत यांच्या घरी पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक आहे. संजय राऊत यांना गेल्या काही दिवसांपूर्वी ईडीने समन्स पाठवले होते. (Sanjay Raut Latest News)

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भांडूपमधील मैत्री या निवासस्थानी ईडीचे पथक दाखल झाले आहे. या आधीही पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय राऊत यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. त्यांना अनेकवेळा समन्स बजावण्यात आले होते. मात्र त्यांनी चौकशीसाठी सहकार्य न केल्याने ईडीचे पथक आता त्यांच्या घरी दाखल झाले असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ईडीने समन्स पाठवले होते. पण राऊत यांनी अधिवेशनाचे कारण देत पुढची तारीख मागितली होती. आज सकाळी संजय राऊतांच्या घरी ईडीची टीम दाखल झाली आहे. राऊत यांची अनेक प्रकरणांमध्ये त्यांची आज चौकशी होण्याची शक्यता आहे. ईडीने याअगोदर दोनवेळा संजय राऊत यांना ईडीचे समन्स बजावण्यात आले होते.

या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माफियागीरी चालणार नाही. महाराष्ट्राला लुटण्याचा प्रयत्न सुरू होता, या प्रकरणी आता संजय राऊत यांना हिशोब द्यावा लागणार आहे, अशी टीका सोमय्या यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! एकाचवेळी खात्यात येणार ₹4,000? जाणून घ्या सत्य

Pitod Recipe : भाजी संपलीय? मग झटपट बनवा खमंग 'पितोड', चवीला लागेल भन्नाट

Political News: मोठी बातमी! 'त्या' २० बंडखोर खासदारांना झटका, सुप्रीम कोर्टाने बजवली नोटीस

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

SCROLL FOR NEXT