Sanjay Raut Speech  Saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut Speech : संकट येऊनही उद्धव ठाकरेंचा चेहरा हसरा, त्यामुळे महाराष्ट्रात जळफळाट; पुण्यात संजय राऊतांची तोफ धडाडली

Sanjay Raut Speech in shiv sankalp melava : संकट येऊनही उद्धव ठाकरेंचा हसरा, त्यामुळे महाराष्ट्रात जळफळाट सुरु आहे, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यावर जोरदार टीका केली आहे.

Vishal Gangurde

नितीन पाटणकर, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. पुण्यात उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात शिवसंकल्प मेळावा पार पडत आहे. यामुळे ठाकरे गटाने पुण्यावर विशेष लक्ष केंद्रीत केल्याचं दिसून येत आहे. ठाकरे गटाकडून आयोजित शिवसंकल्प मेळाव्यातून संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. यावेळी राऊत यांनी सत्ताधाऱ्यांच्या टीकेचाही खरपूस समाचार घेतली. 'संकट येऊनही उद्धव ठाकरेंचा हसरा आहे, त्यामुळे महाराष्ट्रात जळफळाट होत आहे, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली.

शिवसंकल्प मेळाव्यातील संजय राऊतांच्या भाषणातील मुद्दे

महाराष्ट्रात सध्या जी आग लागलेली आहे, ती उद्धव ठाकरे यांच्या हसण्यामुळे लागली आहे.

एवढी संकट येऊनही उद्धव ठाकरे यांचा चेहरा हसरा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या जळफळाट सुरु आहे.

सुषमाताई तुम्हा विचारले काही जागा मिळाल्या पाहिजेत. काळजी करु नका. यादी तयार आहे.

आतापर्यत अनेकांच्या पालख्या शिवसैनिकांनी वाहिल्या. आता स्वतः साठी लढण्याची वेळ आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांनी मुलमंत्र दिला आहे, एक तर तू राहशील नाही, तर मी राहील.

एडीआर या संस्थेचा रिपोर्ट आहे. देशातील ५३८ मतदारसंघातील मतदानात गडबड झाली आहे.

या मतदारसंघातील झालेले मतदान आणि मतमोजणी यामध्ये तफावत आहे.

देशभरात भाजपने ५- ६ लाख मते चोरलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या ३५ जागा वाढल्या आहेत.

'एक तर तू राहशील नाही, तर मी राहील' ही आपली टॅग लाईन आहे. तू जाशील आणि मी राहील, ही आपली जिद्द असली पाहिजे.

बंडखोरांना शिवसेना अशी चोरता येणार नाही.

२८८ उमेदवार ऊभे केले तर, १६० निवडूण आणू.

शब्दाला पक्के आहोत. आपण महाविकास आघाडीत आहोत.

आपण एकत्र निवडणूक लढवणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT