Sanjay Raut on BJP | latest political News Saam Tv
मुंबई/पुणे

Sena-Bjp: बाप रे! हाेय का? छान, कधी पासून हिंदू झाले पहावे लागेल : संजय राऊत

खासदार संजय राऊत यांनी माध्यमांच्या विविध प्रश्नांना उत्तर देताना भाजपवर टीका केली.

जयश्री मोरे

मुंबई : हिंदुत्वाच्या (hindutva) मुद्यावरुन सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सेनेला तत्व राहिलेली नाहीत. दिशाहीन पक्ष झालेला आहे अशी टीका भाजप (bjp) नेते शिवसेनेवर एमआयएम (mim) साेबतच्या कथित युतीवरुन करु लागले आहेत. त्यास सेनेकडून देखील जाेरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. आजही सेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी माध्यमांच्या एका प्रश्नावर आश्चर्य व्यक्त करीत भाजपवर शरसंधान साधले. (sanjay raut latest marathi news)

भाजपचे हिंदुत्व कातडीच तर शिवसेनेचं हिंदुत्व शालीचे आहे. सेनेने आत्मपरीक्षण करावे असे भाजपा म्हणत आहेत या प्रश्नावर खासदार संजय राऊत यांनी आश्चर्य व्यक्त करीत ते म्हणाले बाप रे! हाेय का, छान कधी पासून हिंदू झाले ते पहावे लागेल असा टाेमणाही राऊतांनी लगावला.

महाराष्ट्र, पश्चिम बंगालचा स्वभाव एकच

दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यास केंद्रीय तपास यंत्रणेने आज दिल्लीत बोलवले आहे. त्याच्यावर चौकशीचे ससेमिरा सुरू आहे. महाराष्ट्रात देखील ते सुरू आहे. पण बॅनर्जी यांनी सांगितलं आहे. मी दिल्लीच्या सत्तेपुढे झुकणार नाही. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचा स्वभाव एकच आहे. ही क्रांतिकारांची आणि लढणा-यांची राज्य आहेत. ती दिल्लीपुढं झुकणार नाही हे लक्षात घ्या असे खासदार राऊत यांनी भाजपच्या कारभारावर मत व्यक्त केले.

मनसेच्या शिवजयंतीवर खासदार राऊत म्हणाले कोणी काय करत असेल तो आपल्या बुद्धीचा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मातीत जन्म घेतला आहे. महाराष्ट्रात जन्म घेतला आहे हे महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) या मातीत जन्माला आले म्हणून या महाराष्ट्राला इतिहास आहे. बाकी इतर प्रांतांना मात्र भूगोल आहे. महाराजांच्या नावाने ज्यांना राजकारण अजून काय करायचं त्यांनी करावे. त्यांचे व्यक्तिमत्त्व थोर आणि महान आहे त्यांनी अख्या देशाला दिशा दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT