Sanjay Raut and Raj Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray: सुपारीचं राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही : संजय राऊत (व्हिडिओ पाहा)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाेंग्याबाबत दिलेल्या अल्टिमेटमबद्दल राऊत यांना माध्यमांनी विचारले असता त्यांनी कसला अल्टिमेटम? असा प्रतिप्रश्न केला.

साम न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्र दिनी औरंगाबाद (aurangabad) येथे झालेल्या सभेनंतर आज (मंगळवार) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्यावर औरंगाबाद पाेलीसांनी अटी शर्तींचे पालन न केल्याने विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी त्यात मोठी गोष्ट कोणती? अशी टिप्पणी केली आहे. (raj thackeray latest marathi news)

खासदार राऊत (sanjay raut) म्हणाले देशभरात असे गुन्हे दाखल झाले आहेत. कुणी भडकवणारे भाषण केले, कुणी चिथावणीखाेर लिहिले तर त्याच्यावर कारवाई केली जाते. त्यात मोठी गोष्ट कोणती महाराष्ट्राच्या (maharashtra) विरोधात षडयंत्र रचले जात आहे असेही राऊत यांनी नमूद केले.

राऊत म्हणाले बाहेरच्या राज्यातून लोक मुंबईत (mumbai) आणून येथे गडबड करायची असे नियाेजन केले जात आहे हे आमच्या लक्षात आले आहे. राज्य सरकार आणि पोलिस यंत्रणा या गाेष्टी हाताळण्यास सक्षम आहेत असेही राऊत यांनी नमूद केले.

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाेंग्याबाबत दिलेल्या अल्टिमेटमबद्दल राऊत यांना माध्यमांनी विचारले असता त्यांनी कसला अल्टिमेटम? असले इथे काही चालत नाही. महाराष्ट्रात अल्टिमेटमचे राजकारण चालणार नाही. येथे फक्त ठाकरे सरकारचा शब्द चालेल. इथं उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचे सरकार आहे हे त्यांनी लक्षात घ्यावे असा इशारा देखील राऊत यांनी दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT