ED Summons to Sanjay Raut Brother Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking News: मोठी बातमी! संजय राऊत यांच्या भावाला ईडीचे समन्स, काय आहे प्रकरण?

ED Summons to Sanjay Raut Brother: मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> आवेश तांदळे

ED Summons to Sanjay Raut Brother:

मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. कोव्हिड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी त्यांना समन्स बजावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

सूरज चव्हाण अटक झालेल्या प्रकरणात संदीप राऊत यांचीही होणार चौकशी होणार आहे. पुढील आठवड्यात संदीप राऊत यांना चौकशीला हजर राहण्याचे समन्समध्ये सांगण्यात आलं आहे. याआधी संदीप राऊत यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनेही चौकशी केली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, याआधी मुंबई महानगरपालिकेत कोविडकाळात १३२ कोटींचा खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप झाला होता. त्यात सूरज चव्हाण यांच्यावरही आरोप करण्यात आले होते. यातच ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले आणि नंतर अटक केली. (Latest Marathi News)

सूरज चव्हाण आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. खिचडी घोटाळाच्या आरोपांनंतर काही महिन्यांपूर्वी ईडीने मुंबईत सात ठिकाणी छापेमारी केली होती. यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह सूरज चव्हाण यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता.

शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे सचिव सूरज चव्हाण यांना ईडीने अटक केली आहे. कोविड काळात स्थलांतरीत मजुरांना खिडची वाटपाचा निर्णय हा तत्कालिन ठाकरे सरकारने घेतला होता. यासाठी विविध कंपन्यांना कंत्राटं देण्यात आली होती. यातील एका कंपनीत सूरज चव्हाण यांचा सहभाग होता. आता ईडीने संदीप राऊत यांना चौकशीसाठी बोलवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम'

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

धक्कादायक! बिल भरण्यावरून वाद; बार मॅनेजरला चौघांनी बेदम मारहाण|VIDEO

SCROLL FOR NEXT