Sanjay Raut  
मुंबई/पुणे

बाडग्यांनाे! जेल तुमच्या बापाचं आहे का? संजय राऊत

जयश्री मोरे

मुंबई : भारतीय जनता पक्षातील काही फुटकळ लाेक ज्यांना भाजपा माहित नाही, विचारधारा माहित नाही ते लोक दरराेज धमक्या देताहेत याला तुरुंगात टाकू त्याला तुरुंगात टाकु. अरे तुरुंग विकलेत का? तुरुंग तुमच्या बापाचं आहे का? की तुरूंगाचे खासगीकरण केले आहे? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. मुंबईत ते माध्यमांशी बाेलत हाेते. Sanjay Raut Narendra Modi Kirit Somaiya Jail Mumbai Saamnews

राऊत म्हणाले पंतप्रधान मोदींनी सार्वजनिक जागांचे खासगीकरण केल आहे. तुरूंगाचे सुद्धा खासगीकरण केल आहे का? आणि त्यांच्या चाव्या या काही लोकांकडे दिल्या आहेत का ? जे बाहेरून आले आहेत ? खासगीकरण केल असेल तर सांगा, तुम्ही कायद्याचे पण मालक झालात का? आज याचा नंबर उद्या त्याचा नंबर. तुमचा पण नंबर येईल त्यावेळी तुमच्यासाठी रडण्यासाठी काेणीही नसेल असे राऊतांनी ठणावून सांगितले.

दरम्यान राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर हाेत असल्याचे म्हटले. अप्रत्यक्षरित्या किरीट साेमय्या kirit somaiya यांच्यावर टीका केली असून आता साेमय्या त्यांच्या या वक्तव्यावर काय बाेलणार हे पहावे लागणार.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन

Hartalika Fast : हरतालिकेचा उपवास कधी सोडावा? योग्य वेळ काय? जाणून घ्या

Monday Horoscope: गणरायाचे आगमन अन् 'या' ३ राशींचे नशीब चमकणार; धनलाभासोबत मिळेल मोठी खुशखबर!

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

SCROLL FOR NEXT