Sanjay Raut - Raj Thackeray SAAM TV
मुंबई/पुणे

त्यांच्या पक्षाच्या नावातच 'महाराष्ट्र'; संजय राऊतांच्या आवाहनानंतर राज ठाकरे MVA महामोर्चात सहभागी होणार?

राज ठाकरे देखील विरोधातच आहेत. ते सरकारमध्ये नाही.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : महापुरुषांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) मुंबईत शनिवारी 17 डिसेंबरला महामोर्चा काढण्यात येणार आहे. सर्व महाराष्ट्र प्रेमींना या मोर्चाला पाठिंबा देण्याचं आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं आहे.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील सर्वांना मतभेद झुगारुन मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन राज ठाकरेंसह सर्वांना केलं आहे.

राज ठाकरे देखील विरोधातच आहेत. ते सरकारमध्ये नाही. आम्ही सगळे महाराष्ट्रप्रेमी म्हणून मोर्चात उतरलो आहोत. त्यांच्या तर पक्षाच्या नावात महाराष्ट्र आहे. त्यांनी देखील महाराष्ट्राचा अपमान होत असताना बाहेर यावं. सगळे मतभेद विसरुन, महाराष्ट्रद्रोही सरकार, बेकायदेशीर सरकार, बेमान सरकार, घटनाबाह्य सरकारच्या विरोधात उभं राहणं गरजेचं आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

पोलिसांकडून चोख व्यवस्था

महाविकास आघाडीच्या महामोर्चासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. भाजपही मविआच्या मोर्चाविरोधात प्रतिमोर्चा काढणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रचंड पोलिस बंदोबस्तात हा मोर्चा पार पडणार आहे.

महाविकास आघाडीच्या मोर्चाला दोन ते अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. यात दोन अतिरिक्त पोलिस आयुक्त, 4 ते 5 पोलिस उपायुक्त यांच्याद्वारे हा बंदोबस्त हाताळण्यात येणार आहे.

या मोर्चात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही आणि कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही या अनुशंगाने स्थानिक परिसरात पोलिस आवाहन करणार आहेत. सोबतच या मोर्चात SRPFच्या वाढीव तुकड्यांचाही बंदोबस्त लावण्यात येणार. तसेच ड्रोनच्या माध्यमातून पोलिस मोर्चावर लक्ष ठेवणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

SCROLL FOR NEXT