Sanjay Raut News, Shivsena News, Political News in Marathi Saam Tv
मुंबई/पुणे

उद्या शिवसेनेचे दोन संजय उमेदवारी अर्ज दाखल करणार; राऊत स्पष्टच बोलले

मुख्यमंत्री महाविकास आघाडीमधील नेते उपस्थित राहणार आहेत.

रामनाथ दवणे

मुंबई: राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीचं (Rajyasabha Election) वारं वाहत आहे. सहाव्या जागेवरुन सुरु असलेल्या उलट-सुलट चर्चांना शिवसेनेकडून ब्रेक लावला आहे. आमच्यासाठी सहाव्या जागेचा विषय संपला असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. उद्या 1 वाजता मी आणि संजय पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. (Sanjay Raut News)

मुख्यमंत्री महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aaghadi) नेते उपस्थित राहणार आहेत. आमच्याकडे मतांचा कोठा हा अधिक आहेत असे संजय राऊत (Sanjay Raut) माध्यमांशी बोलताना म्हणाले. आता छत्रपतींचे काय होणार असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की छत्रपती यांच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही. आता संभाजी राजे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.

राज्यात मागच्या काही दिवसांपासून राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राजकारण सुरु आहे. छत्रपती संभाजी राजेंना शिवसेनेकडून उमेदवारी ऑफर करण्यात आली होती. परंतु मला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून घोषित करा अशी मागणी छत्रपती संभाजी महाराजांनी केली होती. त्यावर काही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता संभाजी राजे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अजून संभाजी राजेंनी याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. राज्यात ६ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यातल्या दोन जागा भाजप तर राष्ट्रवादी- काँग्रेसला प्रत्येकी एक जागा आणि शिवसेना दोन अशे चित्र सध्या राज्यात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack risk: दररोजच्या या ५ सवयी तुमच्या हृदयाला पाडतायत आजारी; डॉक्टरांनी सांगितलं कशी घ्याल काळजी?

Ladki Bahin Yojana: e-KYCमध्ये ८६ लाख लाडक्या बहिणी अपात्र,₹१५०० कायमचे बंद, इतक्या महिलांनाच मिळणार लाभ

Maharashtra Live News Update : गोरेगावमध्ये कार व बेस्ट बसची समोरासमोर धडक, अपघातात चालक जखमी

Ayesha Khan : 'धुरंधर'च्या यशामुळे मोठ्या चित्रपटाची लॉटरी, अक्षय कुमारसोबत दिसणार 'शरारत' फेम आयशा खान

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

SCROLL FOR NEXT