Sanjay Raut Latest Marathi News, Sanjay Raut on BJP  Saam TV
मुंबई/पुणे

दिल्लीतून निवडणूक आयोगाला फोन येत होते; संजय राऊतांचा आरोप

केंद्रीय यंत्रणांचा वापर विरोधकांना संवण्यासाठी होत आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यसभा निवडणुकीत (Election) महाविकास आघाडीचा भाजपने पराभव केला. महाविकास आघाडीकडे संख्याबळ असूनही महाविकास आघाडीचा पराभव झाला, यावरुन आता राज्यात आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप (BJP) आणि निवडणूक आयोगावर आरोप केले आहेत. देशातील कोणतीही यंत्रणा स्वतंत्रपणे काम करताना दिसत नाही, असा आरोपही संजय राऊत यांनी केला. (Sanjay Raut Latest Marathi News)

संजय राऊत म्हणाले, आज शिवसेनेचा अयोध्या दौरा होणार आहे. मंत्री आदित्य ठाकरे जाणार आहेत. आम्हाला हनुमान चालीसा शिकवत असेलतर त्यांनी आम्हाला पुस्तक घेऊन शिकवू नये, असा टोलाही राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला.

परिहन मंत्री अनिल परब यांना काल ईडीचे समन्स आले आहे, यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले, देशातील यंत्रणांना कामाला लावले जात आहे. काल काँग्रेसचे राहुल गांधी यांची रात्री १२ वाजेपर्यंत चौकशी केली, विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम सत्ताधारी करत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केला.

अनिल परब (Anil Parab) यांच्यावर कशापद्धतीने ईडीने केस केली आहे, ही चुकीची आहे. मारुन मुटकून तक्रारी केल्या आहेत. निवडणूक आयोगाने सुहास कांदे यांचे मत याच पद्धताने बाद केले आहे. भाजपने यात निवडणूक आयोगालाही ओढले आहे. आज देशात न्यायालयापासून ते निवडणूक आयोगापर्यंत सर्वच यंत्रणा दबावाखाली आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.

शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत बाद करण्यासाठी मुंबईतून दिल्लीत कोणी फोन केले, सेनेचे एक मत बाद करण्यासाठी ७ तास प्रयत्न झाले आहेत. निवडणूक आयोगही आता दबावाखाली काम करत आहे, असा आरोप संजय राऊत (Sanjay Raut)यांनी केला. आज शिवसेना अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. शिवसेना नेहमी अयोध्येला जात असते. आम्ही याचे राजकारण करत नाहीत, असंही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sindhudurg : कणकवली रेल्वे स्थानकात प्रवाशांची तुफान हाणामारी! | VIDEO

Cough Remedies: सतत खोकल्याचा त्रास होत होतोय? 'या' सवयी लगेच सोडा!

Pune Traffic: १ ऑगस्टला पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल, शहरातील अनेक रस्ते बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर

एटीएममध्ये निघाला विषारी नाग; पैसे टाकण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप

WhatsApp मध्ये येत आहेत 'हे' अद्भुत फीचर्स, जाणून घ्या सर्व महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT