Sanjay Raut Saam Tv
मुंबई/पुणे

भाजप पक्षाच्या नेत्यांना भुताटकीने झपाटलं - संजय राऊत

जयश्री मोरे

मुंबई : रायगड जिल्ह्यातील कोर्लई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या १९ बंगल्यांचा शोध लावण्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या मुंबईहून कोर्लईकडे रवाना झाले आहेत. यामुळे पुन्हा एकदा शिवसेना (Shivsena) विरुद्ध राणे वाद रंगण्याची शक्यता आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्यांचा (Kirit Somaiya) वेडसर असा उल्लेख करत ते जेलमध्ये जातील असे खलबजानक व्यक्तव्य केले आहे.(Latest Sanjay Raut News In Marathi)

संजय राऊत म्हणाले की, कोण आहेत किरीट सोमय्या? वेडा माणूस आहे इकडे तिकडे फिरत आहेत. ते जेलमध्ये जाणार असून त्याचा रस्ता शोधत आहेत. येथील जनता त्यांची धिंड काढतील. वेट अँण्ड वॉच…ते कुठे जातात, बंगले शोधतात ही काय बातमी आहे का? बंगले कुठे आहेत ते दाखवा बंगले स्वप्नात येत आहेत. असं संजय राऊत म्हणाले.

हे देखील पहा -

यावर वारंवार स्पष्टीकरण झाले आहे त्या जमीनीवर एकही बंगला नाही हा भुताटकीच्या प्रकार आहे. भाजप पक्षाच्या नेत्यांना भुताटकीने झपाटलं आहे. त्यांच्या स्वतःच्या बेनामी प्राॅपर्टी आहेत म्हणून ते इतरांवर बोट दाखवत आहे. अन्वय नाईक जागेचे मुळ मालक होते त्यांना आत्महत्या का करावी लागली यावर भाजप बोलत नाही त्यांना त्रास देणाऱ्या गुन्हेगारांच्या समर्थनार्थ भाजप नेते उभे राहिले. भाजपच्या लोकांच्या दबावामुळे अन्वयने आत्महत्या केली असा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे.

पुढे राऊत म्हणाले की, अन्वय नाईक हे मराठी उद्योजक होते त्यांच्या कामाचे पैसे मिळाले नाही. त्यांना किरीट सोमय्या यांनी धमकी दिली अर्णब गोस्वामीकडे पैसे मागायचे नाही ही माहिती माझ्या कडे नव्यानं आली आहे. भाजप मराठी माणसाला संपवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसंच किरीट सोमय्या हे काही नेल्सन मंडेला नसून देशातील सर्वात मोठा चोर, लफंगा, डाकू असल्याचा उल्लेख राऊत यांनी केला.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baby Names Inspired by Flowers : सुगंधी आणि नाजूक फुलांवरून मुलींच्या नावाची यादी

Uddhav Thackeray: तुमच्या डोळ्यावरचं झापड पुसलं गेलं, शिंदे गटातून कार्यकर्ते परतले; ठाकरे काय म्हणाले?

Accident : कार- टेम्पोचा भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

Marathi News Live Updates : चेंबूरच्या आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Abhijeet Sawant Success Story : इंडियन आयडल जिंकून रात्रीत स्टार, बिग बॉस मराठी गाजवलं, कोट्यवधींच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिजीतचा संघर्षमय प्रवास, वाचा

SCROLL FOR NEXT