sameer wankhede Saam Tv
मुंबई/पुणे

समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ, ठाण्यात गुन्हा दाखल

ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात समीर वानखेडे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - समीर वानखेडे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोट्या माहितीच्या आधारे मद्यविक्री परवाना मिळवला असल्याचा आरोप वानखेडे यांच्यावर आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी वानखेडे यांच्या बारचा परवाना काही दिवसांपूर्वीच रद्द केला होता. (Sameer Wankhede Latest News)

समीर वानखेडे यांच्या विरोधात उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी शंकर गोगावले यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

नवी मुंबईतील वाशीमध्ये समीर वानखेडे यांच्या नावावर एक बार आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, 1997 मध्ये त्यांनी हा परवाना घेतला तेव्हा त्यांचे 18 वर्षांपेक्षा कमी होते. या बारचे लायसन मार्च 2022 पर्यंत वैध आहे. यावरूनच समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी निशाणा साधला होता.

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दावा केला होता की वानखेडे यांच्याकडे नवी मुंबईतील वाशी येथे परमिट रूम आणि बार आहे, ज्याचा परवाना ते अल्पवयीन असताना 1997 मध्ये मिळाला होता आणि हे बेकायदेशीर आहे.

सरकारी नोकरीत असतानाही वानखेडे यांच्याकडे परमिट रूम चालवण्याचा परवाना होता, जो सेवा नियमांच्या विरोधात आहे, असेही मलिक म्हणाले होते. तेव्हा वानखेडे यांनी मंत्र्यांचे दावे फेटाळून लावले होते. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने वानखेडे यांना बार परवान्यासंदर्भात नोटीस बजावली होती. या प्रकरणाची सुनावणी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुरू होती. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बारचा परवाना रद्द केला.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ODI World Cup : वनडे वर्ल्डकपसंबंधी ICC ने घेतला सर्वात मोठा निर्णय; स्पर्धेचं स्वरुपच बदलणार

पुण्यातील धक्कादायक घटना! शिक्षकाचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार; अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नराधमाला बेदम चोपला

Mumbai AC Local : लोकलचा एसी बंद पडल्यानं श्वास कोंडला; मध्य रेल्वेने तात्काळ घेतला मोठा निर्णय, प्रवाशांना दिलासा मिळणार

Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव बसची दुचाकीला धडक, कॉलेजसमोरच अकरावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, २ गंभीर

Monsoon Special : पावसाळ्यात मका भाजलेला खावा की उकडलेला? आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर?

SCROLL FOR NEXT