मलिकांच्या आरोपानंतर वानखेडेंचं स्पष्टीकरण; 'माझ्या मूळ गावी जा आणि तपासा' Saam TV
मुंबई/पुणे

मलिकांच्या आरोपानंतर वानखेडेंचं स्पष्टीकरण; 'माझ्या मूळ गावी जा आणि तपासा'

आर्यन खान प्रकरण आता एका वेगळ्या वळणावर आहे. ड्रग्स पार्टीवरुन ते प्रकरण आता समीर वानखेडे आणि राज्य सरकार यांच्या भोवती घुमू लागले आहे.

सुरज सावंत

मुंबई: आर्यन खान प्रकरण आता एका वेगळ्या वळणावर आहे. ड्रग्स पार्टीवरुन ते प्रकरण आता समीर वानखेडे आणि राज्य सरकार यांच्या भोवती घुमू लागले आहे. राज्य सरकारमधील मंत्री नबाव मलिक हे रोज समीर वानखेडेंवर नवीन आरोप करत आहेत. आज नवाब मलिकांनी एक फोटो ट्विट करत समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नाची माहिती दिली, त्याचबरोबर त्यांनी समीर वानखेडेंच्या जन्माचा दाखला देखील सर्वांसमोर आणला. हे सर्व आरोप नवाब मलिक करत असताना.

त्यातच आता समीर वानखेडेंनी कॅमेऱ्यासमोर न बोलता मागे माहिती दिली आहे. ते म्हणाले ''माझ्या बाबत खोटे दस्तावेज प्रसिद्ध केले जात आहेत. मी या प्रकाराला चॅलेंज करणार आहे. माझ्या मूळ गावी जा आणि तपासा आपला जो जन्म दाखला सोशल मीडियावर प्रसिद्ध केला जात आहे, तो खोटा आहे. माझ्या विरोधात खोडसाळ प्रकार सुरू आहे याला मी कायदेशीर उत्तर देणार आहे, याबाबत मी लवकरच जाहीर खुलासा करणार आहे''.

दरम्यान काल किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईलने माध्यमांसमोर एक व्हिडीओ प्रसारीत केला. त्याने आर्यन खान प्रकरणाला नवीन वळण मिळाले. किरण गोसावीने कशा पद्धतीने शाहरुख खानची मॅनेजर पुजा ददलानी सोबत डील केली. डील किती रुपयांमध्ये ठरली होती. याची सर्व माहिती त्याने माध्यमांना दिली आहे. आर्यन खानला सोडण्यासाठी तब्बल २५ कोटींची डील झाल्याचं प्रभाकरने सांगितले त्याचबरोबर त्यातले ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना जाणार होते. हा सर्व गोष्टींमध्ये किरण गोसावी, सॅम नावाची व्यक्ती असल्याचे प्रभाकरने सांगितले आहे. प्रभाकरच्या या गौप्यस्पोटानंतर NCB ने स्पष्टीकरण दिले. प्रभाकरने केलेले सर्व आरोप एनसीबीने फेटाळले आहेत. त्याचबरोबर समीर वानखेडे यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून आपल्यावर कारवाई न करण्याची मागणी केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, रस्ता रोको आंदोलन करून अकोला जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन

Election Commission: २०२९च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा बदल होणार; मतदान केंद्रांची संख्या वाढणार, RTIमधून खुलासा

Live Update : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? कोर्टात नेमकं काय झालं? वाचा A टू Z अपडेट

Diabetes and Modak: डायबिटीजचे रूग्ण मोदक खाऊ शकतात का? जाणून घ्या

SET Exam 2026: महत्वाची बातमी! सेटची परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलली, सप्टेंबरमध्ये 'या' दिवशी असेल पेपर

SCROLL FOR NEXT