Sambhajiraje Chhatrapati Saam Tv
मुंबई/पुणे

संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या उमेदवारीचा तिढा सुटणार?; सूत्रांनी दिली 'ही' माहिती

संभाजीराजे छत्रपतींना राज्यसभेसाठी शिवसेना पुरस्कृत उमेदवार मिळणार.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुमित सावंत

मुंबई: राज्यसभेच्या सहाव्या जागेवर संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) छत्रपतींना उमेदवारी शिवसेना पुरस्कृत देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर संभाजीराजेंनी मला शिवसेना नको तर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून घोषित करा अशी मागणी केली आहे. संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी इच्छा शिवसेनेतील नेत्यांनी व्यक्त केली आहे. संभाजीराजेंना शिवसेना पुरस्कृत उमेदवारी देण्यासाठी उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

संभाजीराजे यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचं जाहीर केलं होत. तर शिवसेनेने सुद्धा या जागेवर आपला उमेदवार देण्याचं म्हटलं होत. यानंतर संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (CM Uddhav Thackeray) भेट घेतली. या भेटीत संभाजीराजेंना शिवसेनेकडून सहाव्या जागेवर उमेदवारीची ऑफर देण्यात आली. त्यानंतर आज मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी संजय राऊत यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

हे देखील पाहा

संभाजीराजेंना उमेदवारी देण्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवारी देण्याची मागणी संभाजी राजेंनी केली आहे. संभाजीराजे यांनी दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंची भेट घेतली या भेटीमुळे चर्चेला बळ मिळाले. संजय राऊतांनीही त्यावर खुलासा केला. राज्यसभेची सहावी जागा शिवसेनाच लढवणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. राज्यसभेच्या नियमानुसार दर दोन वर्षांनी सहा सदस्यांची टर्म संपून त्या जागी नव्या सदस्यांची निवड केली जाते. यानुसार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांची देखील टर्म संपत असून त्यांनी पुन्हा एकदा राज्यसभेवर जाण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला आहे.

दरम्यान आता संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) यांचा राज्यसभेचा मार्ग सोपा झाला असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात संभाजीरोजे लवकरच जाहीर करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT