SALMAN KHAN VS LAWRENCE BISHNOI GANG saam tv
मुंबई/पुणे

बिश्नोई गँगचा धुमाकूळ, मुंबईत पुन्हा अंडरवर्ल्ड?70 हजार शार्पशूटरच्या निशाण्यावर बॉलीवूड, गुजरातच्या जेलमधून बिश्नोईची मुंबईत दहशत

Lawrence Bishnoi Gang’s Growing Influence: सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोईमधील वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय..यावेळी बिश्नोई गँगनं टायगर श्रॉफवर हल्ला केल्यानं मुंबईत पुन्हा अंडरवर्ल्डनं कसं डोकं वर काढलयं...बिश्नोई आणि सलमानमधील वाद नेमका काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

एका बाजूला मुंबईने नव्वदच्या दशकातील कुख्यात अंडरवर्ल्डचा काळ मागे सोडल्याचा दावा केला जात असतानाच, गेल्या काही वर्षांत एका नव्या आणि हिंसक सिंडिकेटनं दहशत वाढवून मुंबईत आपले पाय रोवल्याचं दिसतयं... लॉरेंस बिश्नोई गँग आणि त्यांच्या टार्गेटवर असलेला बॉलिवूडचा 'भाईजान' म्हणजेच सलमान खान यांच्यातील वादामुळे मुंबईत अंडरवर्ल्डनं पुन्हा डोकं वर काढलयं....त्यामुळे टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर बॉलीवूड कलाकारांमध्ये लॉरेंस बिश्नोई गँगबद्दल कशी दहशत निर्माण झालीय.....पाहूयात..

लॉरेंस बिश्नोई गँगची वाढती दहशत

2018

जोधपूर कोर्टासमोर लॉरेंस बिश्नोईनं पहिल्यांदा सलमानला मीडियासमोर धमकी

2020-21

बिश्नोईच्या गँगमधील शार्पशूटरकडून सलमानच्या मुंबईतील घराची आणि पनवेलमधील फार्महाउसची रेकी

29 मे 2022

पंजाबमध्ये गायक सिद्धू मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या

मार्च 2023

बिश्नोई गँगमधील गोल्डी बराड आणि रोहित गोदाराच्या नावे सलमानला धमकीचा मेल, मुंबई पोलिसांकडून सुरक्षेत वाढ

एप्रिल 2024

सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबार

12 ऑक्टोबर 2024

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींची मुंबईत गोळ्या झाडून हत्या

16 ऑक्टोबर 2024

कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅप्स कॅफेवर 3 वेळा गोळीबार

1 फेब्रुवारी 2026

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मुंबईतील जुहूमधील घराबाहेर गोळीबार

18 ऑक्टोबर 2026

अभिनेता टायगर श्रॉफवर मुंबईत गोळीबार

दरम्यान लॉरेंस बिश्नोई गँग सलमान खानच्या विरोधात का आक्रमक झालीय...पाहूयात..

बिश्नोई समाजात काळवीटाला पवित्र मानले जाते आणि त्याची पूजा केली जाते.

1998 मध्ये 'हम साथ साथ है' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राजस्थानमध्ये सलमानवर काळवीटाचा शिकार केल्याचा आरोप

सलमान खान बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन जाहीरपणे माफी मागत नाही. तोपर्यंत गँग त्याचा पाठलाग सोडणार नसल्याचं बिश्नोई गँगचा दावा

त्यामुळे टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर आता बिश्नोई गँगच्या अनिल पंडितनं दुसरी ऑडिओ क्लिप व्हायरल केलीय...70 हजार शार्पशूटर अलसल्याची धमकी देत सलमानला माफी मागण्याबाबत पंडितनं काय म्हटलयं..ऐका...

दरम्यान सलमानला धमकी देणार अनिल पंडित कोण आहे? पाहूयात...

टायगरवर हल्ला करणारा अनिल पंडित कोण?

हरियाणाच्या पानिपतचा रहिवासी, अमेरिकेत लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी काम

2024मध्ये डंकी रूटद्वारे बेकायदा अमेरिकेत पोहोचला

अमेरिकेला जाण्यापूर्वी कुठलाही गुन्हा दाखल नव्हता

8 महिन्यांपूर्वी लॉरेन्स बिश्नोई गँगमध्ये रणदीप मलिकची जागा घेतली

11 जून 2026 रोजी दिल्लीत गुरु रंधावाच्या जिमबाहेर झालेल्या गोळीबारानंतर चर्चेत

सिद्धू मुसेवाला, बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि आता रोहित शेट्टी, टायगर श्रॉफसारख्या सेलिब्रिटींवर होणारे हल्ले यावरून बिश्नोई गँग फक्त धमक्या न देता प्रत्यक्षात गुन्हेगारी कृत्ये करून दहशत निर्माण करताना दिसतेय...सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना जोडणे, खंडणी उकळणे आणि बॉलीवूडमध्ये दहशत पसरवणे यामुळे "मुंबईत पुन्हा नवं अंडरवर्ल्ड उभं राहतंय का?" असा गंभीर प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय... मात्र गुजरातच्या साबरमती जेलमधून लॉरेन्स बिश्नोई आपली गँग चालवत असताना पोलिस प्रशासन बिश्नोईविरोधात कठोर निर्णय का घेत नाही? बिश्नोईला नेमकं कोण वाचवतयं? हा खरा प्रश्न आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT