Salman Khan Saam Tv
मुंबई/पुणे

सलीम आणि सलमान खान पितापुत्राला धमकी; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. वांद्रे पोलिसांनी (Police) अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. हे धमकीचे पत्र सलीम खान यांच्या सुरक्षा रक्षकाला मिळाले आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

सलमान खान ज्या ठिकाणी वॉकला जातो आणि ज्याठिकाणी ब्रेक घेतो त्या ठिकाणी हे पत्र मिळाले आहे. यामुळे आता बॉलिवूड (Bollywood) विश्वास खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञाताविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील पाहा

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अभिनेता सलमान खान याला मिळालेले धमकीचे पत्र त्याचे वडील सलीम खान यांच्या सुरक्षा रक्षकाला मिळाले आहे. सलमान ज्या ठिकाणी वॉकला जातो, त्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबतो, त्या बाकड्यावर मिळाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

या पत्रात सलमान धमकी दिली आहे. या पत्रात सलमान आणि सलीम खान या दोघांना गंभीर धमकी दिली आहे. 'मूसा वाला जौसा कर दूंगा' अशा आशयाचे हे पत्र आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू करुन, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहेत. सलमानला आलेल्या धमकीच्या पत्रानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

...तर भाजपला आम आदमी पार्टी व्हायला वेळ लागणार नाही; आमदाराच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या

Types of Paithani Saree Design: सणासुदीत उठून दिसायचंय? ट्राय करा 'या' ७ खास लेटेस्ट डिझाइन्सची पैठणी साडी

Mumbai Beach : मुंबईजवळचं 'मिनी गोवा'! पावसाळ्यात निसर्ग प्रेमींसाठी परफेक्ट ठिकाण

Monday Horoscope: मोठ्यांचा आदर करा! 4 राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Cabinet Reshuffle: मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेंनंतर दिल्लीतील हालचालींना वेग; पंतप्रधान मोदींनी मागवलं मंत्र्यांच्या कामगिरीचा रिपोर्ट

SCROLL FOR NEXT