Sachin Waze Saam Tv
मुंबई/पुणे

Sachin Waze: चांदिवाल आयोगाविरोधात सचिन वाझेने केलेली याचिका बिनशर्त मागे

वाझेच्या या याचिकेवरुन न्यायालयाने काल त्याला फटकारले होते. त्यानंतर ही याचिका मागे घेण्यात आलीये.

सुरज सावंत

मुंबई: चांदिवाल आयोगाविरोधात सचिन वाझेने केलेली याचिका बिनशर्त मागे घेतली आहे. वाझेच्या या याचिकेवरुन न्यायालयाने काल त्याला फटकारले होते. त्यानंतर ही याचिका मागे घेण्यात आलीये (Sachin Wazes petition against Chandiwal Commission withdrawn unconditionally).

चांदिवाल आयोगाला (Chandival Commission) दिलेले चार अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाविरोधात सचिन वाझे (Sachin Waze) याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका (Petition) दाखल केली होती. मात्र, योग्य माहिती लपवत असल्याबद्दल खंडपीठाने वाझेच्या वकिलांना झापलं. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाचे सचिन वाझेवर ताशेरे ओढले. तसेच, ही याचिका मागे घेण्यास सांगितले होते. त्यानंतर अखेर आज ही याचिका मागे घेण्यात आलीये.

मुंबई उच्च न्यायालयाने वाझेला खडसावले

100 कोटी वसूली प्रकरणाची चौकशी सुरु असलेल्या चांदिवाल आयोगाविरोधात सचिन वाझेने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल केली होती. ही याचिका मागे घ्या, अन्यथा कठोर कारवाई करु, असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने वाझेला खडसावले होते. याप्रकरणी आज दुपारी 12 वाजेपर्यंत निर्णय कळवण्याचे निर्देशही त्यांना देण्यात आले होते.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवे अध्यक्ष रोहित पवार

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

SCROLL FOR NEXT