Money Laundering Case साम टिव्ही
मुंबई/पुणे

Money Laundering Case: मनी लाँड्रिंग प्रकरणात साक्षीदार होण्यास सचिन वाझे तयार, देशमुखांच्या अडचणीत वाढ होणार?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सुरज सावंत

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने ईडीला मनी लाँड्रिंग प्रकरणात साक्षीदार बनण्याची तयारी दर्शवली आहे. तसे पत्रच सचिन वाझेने ईडीला लिहिले आहे (Sachin Waze letter to ED seeking to be declared an approver in the money laundering case against Anil Deshmukh).

चांदिवाल आयोगातही सचिन वाझे (Sachin Waze) याने आपली साक्ष फिरवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, आयोगाने तो फेटाळून लावला. आपण दबावापोटी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या बाजूने साक्ष दिल्याचे वाझेने आयोगासमोर दिलेल्या पत्रात म्हटले होते.

तर दुसरीकडे ईडी (Enforcement Directorate) ने दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर अनिल देशमुख यांनी जामीनासाठी ईडी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. त्यावर 14 फेब्रुवारीला सुनावणी होणार असून अशात वाझेने ईडीला लिहिलेल्या पत्रामुळे देशमुख यांना जामीन मिळतो का, हे पाहण महत्वाचं आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात रस्त्याच्या मागणीसाठी तीन गावातील गावकऱ्यांचे आमरण उपोषण

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

SCROLL FOR NEXT