Why did NIA court grant bail to Sachin Waze in Antilia case saam tv
मुंबई/पुणे

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

Sachin Waze Granted Bail: अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना विशेष एनआयए न्यायालयाने जामीन मंजूर केलाय.

Bharat Jadhav

साक्षी यादव, साम प्रतिनिधी

माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयए विशेष न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय. मनसुख हिरेन हत्या आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणातील एनआयएच्या गुन्ह्यात वाझेंना हा जामीन देण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, वाझेने या प्रकरणात साडेपाच वर्षांचा कालावधी तुरुंगात घालवल्याने हा मुद्दा लक्षात घेऊन कोर्टाने त्याला जामीन दिलाय.

जामिनासाठी १ लाख रुपयांचा वैयक्तिक बाँड आणि स्थानिक जामीनदाराची अट

सचिन वाझेंना पासपोर्ट असल्यास तो एनआयएकडे जमा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच या प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदारांचे पुरावे नोंदवले जाईपर्यंत वाझेंना मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांच्या हद्दीत राहता किंवा प्रवेश करता येणार नाही.

कोर्टात सुनावणीसाठीच मुंबईत येण्याची परवानगी

सुनावणीच्या निश्चित तारखेला न्यायालयात हजर राहण्यासाठी वाझेंना या जिल्ह्यांमध्ये येता येईल. मात्र, कोर्टाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर त्यांनी संबंधित जिल्ह्यांची हद्द तातडीने सोडून निर्धारित निवासस्थानी परत जाणे बंधनकारक असेल.

वाझे १३ मार्च २०२१ पासून कोठडीत

सचिन वाझे हे १३ मार्च २०२१ पासून कोठडीत आहेत. एनआयएकडून या प्रकरणात १४ हजारांहून अधिक पानांचे आरोपपत्र, ३२० साक्षीदार आणि मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक व डिजिटल पुरावे असल्याचे त्यांच्या जामीन अर्जात नमूद करण्यात आले..

न्यायालयाचे निरीक्षण

न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर करताना आरोपपत्रातील पुरावे, यूएपीएअंतर्गत आरोप, मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील परिस्थितीजन्य पुरावे आणि इतर आरोपींना मिळालेला जामीन यांचा विचार केला. न्यायालयाने नमूद केले की आरोप निश्चित करण्यासाठी आवश्यक असलेला ‘प्रथमदर्शनी’ निकष आणि जामीन नाकारण्यासाठी आवश्यक असलेला निकष पूर्णपणे समान नसतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

Ayushman Bharat Yojana: 5 लाखांपर्यंत मोफत उपचार! आयुष्मान कार्ड तुमच्याकडे आहे का? पाहा A टू Z माहिती

Bank Account Money After Death: खातेदाराच्या मृत्यूनंतर बँक खात्यातील पैशांचे काय होते? जाणून घ्या नियम

Famous Singer : प्रसिद्ध गायक झाला बाबा; घरी आला चिमुकला पाहुणा, ५ महिन्यांपूर्वी बांधली लग्नगाठ

Pitru paksha : पितृपक्षात दुर्दैवी घटना! श्राद्धासाठी नदीवर गेलेल्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT