Sachin Tendulkar  Saam tv
मुंबई/पुणे

Sachin Tendulkar : अरे व्वा...! 'किक्रेटचा देव' आता चितळे बंधू मिठाईवाले यांचा ब्रँड अँबॅसेडर

Sachin Tendulkar news : 'किक्रेटचा देव' सचिन तेंडुलकर आता चितळे बंधू मिठाईवाले यांचा ब्रँड अँबॅसेडर असणार आहे. याबाबत इंद्रनील चितळे यांनी घोषणा केली आहे.

Vishal Gangurde

सचिन जाधव, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : क्रिकेटचं मैदान गाजवणारा भारतरत्न सचिन तेंडुलकर आता चितळे बंधू मिठाईवाले यांचा ब्रँड अँबॅसेडर झाला आहे. चितळे बंधू मिठाईवाले यांनी ७५ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. मिठाई, नमकीन आणि स्नॅक्स पदार्थांसाठी भारतभर नावलौकिक असलेले चितळे बंधू मिठाईवाले यांनी यावर्षी ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. याचे औचित्य साधून चितळे बंधूंनी सचिन तेंडुलकरची बँड अँबॅसेडरपदी नियुक्ती केली आहे.

भारतरत्न सचिन तेंडुलकर आता चितळे बंधू मिठाईवाले यांचा ब्रँड अँबॅसेडर झाला आहे. चितळे बंधू मिठाईवाले अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना 'क्रिकेटचा देव' अशी ओळख असलेला भारतरत्न सचिन तेंडुलकर आता चितळे बंधू मिठाईवाले यांचे ब्रँड अँबॅसेडर असणार आहे, अशी घोषणा चितळे बंधू मिठाईवालेचे भागीदार केदार आणि इंद्रनील चितळे यांनी केली आहे.

नजीकच्या भविष्यातील चितळे बंधू यांचा हा प्रवास सचिन तेंडुलकर प्रमाणेच परंपरा आणि 'स्टार पॉवर' यांचा संगम असलेला आणि सचिनच्या चाहत्यांप्रमाणेच ग्राहकांनाही आनंद देणारा असेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

इंद्रनील चितळे काय म्हणाले?

इंद्रनील चितळे यांनी म्हटले की, 'चितळे बंधू मिठाई राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी आणि विस्तार होण्यासाठी सचिन तेंडुलकर यांची बँड अँबॅसेडरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन तेंडुलकर यांनीही पदाची आमची विनंती स्वीकारली. त्याची घोषणा आज करत आहोत. यामुळे सचिन तेंडुलकर यांचा चेहरा जागतिकरित्या स्वीकारलेला आहे. बेस्ट ऑफ महाराष्ट्र या टॅगखाली या गोष्टीचा फायदा आम्हाला होऊ शकतो. त्यादृष्टीने सचिन तुम्हाला दिसत राहील'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electric Shock : मोटार सुरु करताना विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू; माहेरच्यांचा मात्र घातपाताचा आरोप

Maharashtra Live News Update : रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक 15 तासानंतर सुरू

Oli Bhel Recipe: चौपाटीवर मिळणारी चटपटीत ओली भेळ, वाचा सीक्रेट रेसिपी

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

SCROLL FOR NEXT