Dr. Ravi Godse Saam Tv
मुंबई/पुणे

Corona BA.2 Variant: भारताने आता मास्क काढले तरी चालतील - डॉ. रवी गोडसे (Saam EXCLUSIVE)

सध्या चीनमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट बीए.2 (BA.2) ने धुमाकूळ घातल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: सध्या चीनमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट बीए.2 (BA.2) ने धुमाकूळ घातल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळे भारतात कोरोनाची चौथी लाट येणार का याची भीती सर्वांनाच लागून आहे. याबाबत प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. रवी गोडसे (Dr. Ravi Godse) यांनी साम टीव्हीला मुलाखत एक्सक्लुझिव्ह (Saam Tv Exclusive Interview) दिली. यावेळी त्यांनी सांगितलं की भारताने आता मास्क काढले तरी चालतील, असं माझं वैयक्तिक मत आहे. पाहा डॉ. रवी गोडसे काय म्हणाले -

मी स्वत: मास्क घालतो. मास्क घालायला अगदी सोपा आहे. स्थानिक प्रशासनाविरोधात काहीही करु नका. ते जे सांगतील ते ऐका. पण, माझा या सरकारला छोटासा प्रश्न आहे की, जर्मनीत मास्क जास्त आहेत आणि लोक कमी आहेत. दोन वर्ष मास्क घातलेत. पण, आता जर्मनीत किती केसेस आहेत. लसीकरणही चांगलं झालं आहे. हाँगकाँगमध्ये जगात सर्वात चांगले मास्क घातले जातात. पण, तिथे दहा लाख केसेस आहेत. त्यांची लोकसंख्या 75 लाख आहे. या दोन वर्षात तुम्ही काहीच शिकला नाहीत. तीच तीच चूक परत करायची.

भारतात औषधं आणण्याची गरज

कोरोनाचे (Covid 4th Wave) सर्व नियम गेल्या दोन वर्षांपासून सर्वचजण करत आहेत. त्याने काय लागलंय हाती. आता विचार बदलायची गरज आहे. ओमिक्रॉनच्या रुग्णांवर निर्माट्रेवीर हे औषध 90 टक्के परिणामकारक आहे. सोट्रोविमाब आणि बेबेटेलेविमाब ही दोन औषधं 80 टक्के औषधं परिणामकारक आहेत. मास्क न लावलेल्या लोकांमागे 500 रुपयांसाठी धावण्यापेक्षा ही तीन औषधं भारतात आणा. इथे काम करुन दाखवा, असं म्हणत त्यांनी सरकारवर संताप व्यक्त केला.

भारतातील संसर्ग पाहता माझं वैयक्तिक मत असं आहे की भारताने आता मास्क काढले तरी चालतील. देशातील अनेक देशांनी निर्बंध काढले आहेत. लोकांना कळलंय की आता या कोरोना बरोबरच राहायचं आहे. हा पूर्ण जाणार नाहीये, असंही डॉ. गोडसे म्हणाले.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नवरात्र उत्सवाला एकनाथ शिंदे भेट देणार

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

SCROLL FOR NEXT