फक्त नेपाळ मध्येच येणारे रुद्राक्षाचे मणी आता मावळच्या थंड वातावरणात Saam TV
मुंबई/पुणे

फक्त नेपाळ मध्येच येणारे रुद्राक्षाचे मणी आता मावळच्या थंड वातावरणात

तळेगाव दाभाडे येथील शशांक ओगले यांचा यशस्वी प्रयोग.

दिलीप कांबळे

पुणे: सहयाद्रीच्या कुशीतील असलेल्या  मावळच्या थंड वातावरणात अनेक वृक्षांच्या प्रजाती वाढीस पोषक ठरत आहेत. तळेगाव दाभाडे येथील शशांक ओगले यांच्या घराच्या अंगणातील रुद्राक्षाच्या झाडाला पूजा आणि सकारात्मक उर्जेच्या दृष्टीने पवित्र मानली जाणारी पंचमुखी रुद्राक्षाची फळे लगडू लागली आहेत.

लोणावळ्यातील टाटा पॉवरच्या पर्यावरण आणि मत्स्यसंवर्धन विभागात काम करून निवृत्त झालेले ख्यातनाम मत्स्यतज्ञ शशांक ओगले हे वृक्षप्रेमी असल्याने त्यांनी मावळच्या तळेगाव दाभाडे येथील श्री नगरीमधील आपल्या घराभोवती पाच गुंठ्यांच्या परस बागेत अनेक देशी आणि आयुर्वेदिक वनस्पती जोपासल्या आहेत.

केवडा, बकुळ, तुती, बेल, आवळा, गुलाबी करवंद, दालचिनी, कॉफी, आदींसह विविध दीडशे प्रजातीच्या झाडांचा समावेश आहे. साधारणतः दहा वर्षांपूर्वी अभ्यास दौऱ्यावर गेलेले असताना नेपाळमधील काठमांडू येथील राष्ट्रीय उद्यानातील रोपवाटिकेतुन रुद्राक्षाची दोन रोपे यांनी आणली. विशिष्ट प्रकारे निगा राखल्याने वीस फुटांपर्यंत ती झाडे वाढली. मात्र त्यातील एक झाड सुकल्याच ओगले यांना फार दुःख झाले आहे.

उत्तर भारत, इंडोनेशिया, बाली, जावा, ऑस्ट्रेलिया आणि नेपाळच्या सदाहरित वनांच्या थंड हवामानात आढळणारे रुद्राक्षाचे हे झाड मावळच्या मध्यम थंड वातावरणात लिलया वाढले. मात्र एक झाड वाळले तर दुसऱ्या झाडाला फळे यायला सुरुवात झाली. रुद्राक्षाच्या झाडास साधारणतः एप्रिल ते मे दरम्यान पांढऱ्या रंगाची झालरी सारखी पाकळ्यांची लहान फुले येतात. पुढील महिन्यात हे फळ तयार व्हायला सुरुवात होते. फळाच्या गराच्या आत नक्षीदार आकाराचे टणक रुद्राक्ष असतात. मावळ मध्ये प्रथमच रुद्राक्ष चे झाड येऊन त्यावर रुद्राक्ष येत असल्याने परिसरात सर्वत्रच आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भोंदू अशोक खरात कोर्टात हजर; न्यायालयीन कोठडी मिळण्याची शक्यता

ग्रामीण भागातील लाडक्या बहिणींसाठी सरकारने आणली जबरदस्त योजना; आता महिलांना मिळणार २४ लाख रुपये

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल; २४k, २२k, १८k सोन्याची प्रति तोळा किती किंमत? वाचा ताजे दर

IPL 2026: 1...2...3 नाही तर तब्बल 11 चेंडू; अर्शदीप सिंगने हद्दच केली, फेकली सर्वात मोठी ओव्हर

Dhurandhar 2 Box Office: बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंहचा जलवा; 'धुरंधर २' ची १३ दिवसात १५०० कल्बमध्ये एन्ट्री

SCROLL FOR NEXT