Rohit Pawar  saam tv
मुंबई/पुणे

Rohit Pawar: आगामी लोकसभा निवडणूक लढवणार का? रोहित पवार म्हणाले...

Rohit Pawar Latest News: रोहित पवार हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. या चर्चेवर आमदार रोहित पवारांनी भाष्य केलं आहे.

Vishal Gangurde

Rohit Pawar News :

राज्यातील राजकीय नेत्यांना आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी देखील सुरु केली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी मतदारसंघात मतदारांशी संवादही सुरु केला आहे. दुसरीकडे आमदार रोहित पवार हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. या चर्चेवर आमदार रोहित पवारांनी भाष्य केलं आहे. (Latest Marathi News)

आमदार रोहित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. रोहित पवार म्हणाले, 'पुण्यातील आंबेगावमधील पदाधिकारी अनेक वेळा शरद पवारांकडे आले. आंबेगावमध्ये सभा घेण्याची विनंती केली. आता आंबेगावमधील सभा मोठी होणार आहे. आता सबेला जायचं नाही म्हणून अनेकांना धमक्यांचे फोन आले आहेत. नागरिकांनी ही सभा घेतली आहे. त्यामुळे सभेला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास आहे'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आढळराव पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. यावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, 'माजी खासदार आढळराव पाटी यांना म्हाडाचे अध्यक्ष पद मिळाले. लोकसभेच्या अगोदर एखादे पद मिळाले तर ती व्यक्ती उमेदवार राहत नाही. अजित पवार यांच्या घरातील काही लोक शिरूरमध्ये देवदर्शनासाठी येवून गेली. त्यामुळे आता पार्थ पवार मावळ नाही तर शिरूरमधून निवडणूक लढविणार अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र शिरूरमधून अमोल कोल्हे हेच निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे'.

लोकसभा निवडणूक लढण्याविषयीच्या चर्चेवर रोहित पवार म्हटले, 'मी आमदारकीसाठी उभा राहायच्या आधी मी शिरूरमधून लोकसभा लढविणार अशी चर्चा होती. आताही चर्चा आहे. मात्र, मी कर्जत जामखेडला सोडणार नाही. मला त्यांनी लढायला शिकविले, त्यांच्यामुळे माझी ओळख राज्यात झाली.मी आमदारकीच लढविणार आहे. मात्र आपल्या विचाराचे खासदार निवडून आणण्यासाठी कार्यकर्ता म्हणून मी काम करणार आहे'.

मराठा आरक्षणावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, 'मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे ही भूमिका आमची आहे. विविध समाजामध्ये वाद करण्याचे काम हे सरकार करत आहे. हे सरकार गुंता करत आहे. दोन समाजात वाद केल्याने याचा फायदा सत्तेतील सरकारला लोकसभेला होईल असं मत आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supriya Sule : पोर्शे गाडी प्रकरणात बदनामी केल्यामुळे शरद पवारांना नोटीस; सुप्रिया सुळेंचा भरसभेत गौप्यस्फोट

6,6,6,6,6...द.आफ्रिकेत Sanju Samsonचं वादळ! असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच भारतीय फलंदाज

IND vs SA 1st T20I: दक्षिण आफ्रिकेत संजू सॅमसन शो.. दमदार अर्धशतकासह मोडला मोठा रेकॉर्ड

Raj Thackeray Speech : सूरत-गुवाहाटी, पहाटेचा शपथविधी, शिवसेना; राज ठाकरेंची एकाच सभेत ठाकरे, पवार, शिंदे, फडणवीसांवर तोफ

Champions Trophy 2025: टीम इंडियाचा पाकिस्तानात जाण्यास नकार! या देशात होणार सामने

SCROLL FOR NEXT