न्यायालयाच्या आदेशानुसार जीआर काढून समिती गठीत केली जाईल - अनिल परब वैदेही काणेकर
मुंबई/पुणे

ST Bus Strike: न्यायालयाच्या आदेशानुसार जीआर काढून समिती गठीत केली जाईल - अनिल परब

संप चिघळण्यापेक्षा त्यावर तोडगा काढायचा काम सरकार करत आहे

वैदेही काणेकर साम टीव्ही मुंबई

मुंबई - राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन आता आणखी चिघळले आहे. ३०च्या वर एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालय जो आदेश देईल त्याचे पालन करू, न्यायालयाच्या आदेशानुसार जीआर काढून समिती गठीत केली जाईलअसे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले आहेत.

हे देखील पहा -

पुढे अनिल परब म्हणाले की, सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याचे न्यायालयाला सांगण्यात येईल आणि त्यानंतर न्यायालय आपला निर्णय देईल. महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन केल्याशिवाय आम्ही कामावर हजर राहणार नाही, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी घेतली आहे. याच विलीनीकरण बाबत सरकार कायदेशीर प्रक्रिया आज पूर्ण करेल. विलीनीकरण केल्यास सरकारच्या तिजोरीवर किती ताण पडेल याचा अभ्यास ही कमिटी करणार आहे. मुख्यसचिव, परिवहन सचिव, फायनान्स सेक्रेटरी यांच्या अधिपत्याखाली त्रिसदस्यीय समिती असेल आणि त्याचा जीआर काढला जाईल. विलीनीकरणाच्या एकूणच मागणिबाबत अभ्यास करून या समितीने आपला निर्णय सरकारला द्यायचा आहे. तसेच संप चिघळण्यापेक्षा त्यावर तोडगा काढायचा काम सरकार करत आहे असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

ऐन दिवाळीत हा संप पुकारल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत कारण आज एसटी संपाचा आजचा चौदावा दिवस आहे. राज्यातील अनेक बस डेपो बंद आहेत. वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहे. आता न्यायालय यावर काय आदेश देणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT