pune news  Saam tv
मुंबई/पुणे

Police action in Pune : आली आली रे गुंडाची वेळ आली, पोलिसांची सटकली; पुण्यात आता 'खाकी' पॅटर्न, VIDEO

Yervada crime latest updates : पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आली आहे. गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी कारवाईसाठी सुरुवात केली आहे. 'खाकी' पॅटर्न राबवत पोलिसांनी गुन्हेगारांची धिंड काढली.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे : संपूर्ण राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारीची जोरदार चर्चा सुरु आहे. राज्यातील पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढल्याचं बोललं जात आहे. पुण्यात गुन्हेगारांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असल्याची टीका केली जात आहे. याचदरम्यान, येरवाडा भागत एका गुन्हेगाराने तुरुंगातून सुटल्यानंतर जंगी सेलिब्रेशन केलं होतं. त्यानंतर त्याच गुंडांची पोलिसांनी धिंड काढली. या गुंडांना पोलिसांनी 'खाकी पॅटर्न' दाखवला आहे.

पुण्यात गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी खाकी पॅटर्न दाखवायला सुरुवात केली आहे. याचाच अनुभव काल येरवाडा भागात आला, जिकडे सराईत गुन्हेगारांची पुणे पोलिसांनी धिंड काढली. याच पार्श्वभूमीवर आता पुण्यातील गुंडांची कुंडली तयार झाली असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. त्यामुळे येत्या काळात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या लोकांना पुणे पोलिसांनी चांगलाच दम दिला आहे.

येरवडाजवळ काय घडलं होतं?

पुण्यात गुरुवारी येरवडा कारागृहातून मोक्काच्या गुन्ह्यातून सुटल्यानंतर गुन्हागाराने जंगी सेलिब्रेशन केलं होतं. या गुन्हेगाराने चारचाकी आणि दुचाकीवरून रॅली काढून सेलिब्रेशन केलं होतं. या रॅलीमुळे परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरानंतर त्याच्या ४० साथीदारांवर गुन्हा दाखल केला होता. त्याचबरोबर रॅली काढणाऱ्या आरोपींना पोलीसांनी अटक देखील केली होती.

पुण्यातील प्रफुल्ल उर्फ गुड्या कसबे याच्यावर मोक्काचा गुन्हा दाखल झाला होता. त्याच गुन्ह्यातून गुड्या जामिनावर सुटला होता. जमिनीवर सुटल्यानंतर त्याने जंगी सेलिब्रेशन केलं होतं. त्याच्या सेलिब्रेशनसाठी २०-३० दुचाकी आमि चारचाकीवरून रॅली काढण्यात आल्या. मोक्काचा गुन्हा दाखल झालेल्या गुड्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. गुड्याचं सेलिब्रेशन एकीकडे सुरु असताना कॉल सेंटरमधील एका तरुणीची हत्या झाल्याची घटना घडली होती. पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर कसबेच्या मित्रांनी रॅली काढली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवारांचा शरद पवारांना मोठा धक्का, दौंडचा शिलेदार घड्याळ हातात घेणार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

WhatsApp वर 'Online' दिसणं टाळायचंय? ही सेटिंग बंद करा, फॉलो करा 'हे' टिप्स

Sunday Horoscope Update : चूक केली असेल तर लगेच माफी मागा…; वाचा आजचे राशीभविष्य

Idli Recipe : रात्रीचा भात भरपूर उरलाय? झटपट बनवा मऊसर इडली

SCROLL FOR NEXT