Mira Road Railway Station Saam tv
मुंबई/पुणे

Mira Road Railway Station: रेल्वे प्लॅटफॉर्मवर घुसवली रिक्षा, दारूच्या नशेत रिक्षाचालकाचा प्रताप

Police Detain Rickshaw Driver : रेल्वे पोलिसांनी रिक्षाचालकाला (Riksha Driver) ताब्यात घेतले आहे. पोलीस (Railway Police) या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Priya More

चेतन इंगळे, मीरा रोड

Mira Road News: रस्त्यावर नाही तर थेट रेल्वे प्लॅटफॉर्मवर (Railway Platform) रिक्षा चालवल्याची घटना समोर आली आहे. मीरा रोड रेल्वे स्थानकावर ही घटना घडली आहे. दारुच्या नशेमध्ये रिक्षाचालकाने हा प्रताप केला आह. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुर्घटना घडली नाही. रेल्वे पोलिसांनी रिक्षाचालकाला (Riksha Driver) ताब्यात घेतले आहे. पोलीस (Railway Police) या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली आहे. दारूच्या नशेमध्ये रिक्षाचालकाने थेट मीरा रोड रेल्वे स्थानकावर रिक्षा घुसवली. या रिक्षा क्रमांक एम एच 04- जे एच -4363 आहे. रिक्षाचालकाने प्लॅटफॉर्म वरच्या जिन्यावर रिक्षा चालवत दुसऱ्या बाजूने रिक्षा उतरवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचा प्रयत्न फसला.

मात्र रिक्षाचालक दारूच्या नशेत असल्याने त्याला रिक्षा प्लॅटफॉर्मवरुन खाली उतरवणे शक्य झाले नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. अजून ही रिक्षा मीरारोड रेल्वे प्लॅटफॉर्म वरच उभी असल्याची दिसत आहे. जागरूक नागरिकांनी रिक्षा चालकाला पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. रिक्षाचालक दारुच्या नशेमध्ये असल्यामुळे मोठी घटना घडली असती. असे असताना देखील रेल्वे पोलीस प्लॅटफॉर्मवर उपस्थित नसल्याचे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

Phone Charging: फोन चार्ज करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा आग लागू शकते

SCROLL FOR NEXT