फायनान्स कंपन्यांच्या विरोधात रिक्षाचालकांचं बोंबाबोंब आंदोलन ! अजय दुधाणे
मुंबई/पुणे

फायनान्स कंपन्यांच्या विरोधात रिक्षाचालकांचं बोंबाबोंब आंदोलन !

अंबरनाथमध्ये रिक्षाचालकांचं बोंबाबोंब आंदोलन फायनान्स कंपन्यांच्या जाचाविरोधात रिक्षाचालक आक्रमक झाले असून हप्ते न भरल्यानं रिक्षा उचलून नेल्या जात आहेत असा रिक्षाचालकांचा आरोप आहे.

अजय दुधाणे

अंबरनाथ : हातावर पोट असलेले रिक्षाचालक कोरोना काळात जवळपास वर्षभर घरी होते. मात्र तरीही त्यांनी हप्ते भरले नाहीत, म्हणून फायनान्स कंपन्या त्यांच्या रिक्षा जप्त करून नेतायत. याविरोधात रिक्षाचालकांनी आज अंबरनाथमध्ये बोंबाबोंब आंदोलनMovement केलं.हे आंदोलनास प्रहार संघटनेचे जितेंद्र पाटोळे यांनी सुद्धा पाठिंबा दिला होता.Rickshaw pullers' agitation against finance companies

हे देखील पाहा-

मागील वर्षभर कोरोनामुळेCorona जनजीवन पुरतं विस्कळीत झालं होतं. हातावर पोट असलेले रिक्षाचालक जवळपास वर्षभर घरी होते. यापैकी बहुतांशी रिक्षाचालकांनी त्यांच्या रिक्षा कर्जLoan काढून घेतलेल्या आहेत. मात्र रिक्षाचालक घरी असतानाही त्यांच्याकडे फायनान्स कंपन्यांकडून हप्ते भरण्यासाठी तगादा लावला जातोय. तसंच हप्ते न भरल्यास त्यांच्या रिक्षा उचलून नेल्या जातायत. फायनान्स कंपनीचे रिकव्हरी एजंट हे गुंड प्रवृत्तीचे असून त्यांना विरोध केल्यास मारहाणीसारखे प्रकारही घडत असल्याचा रिक्षाचालकांचा आरोप आहे.

अशा परिस्थितीत आम्ही घर चालवायचं? की हप्ते भरायचे? असा रिक्षाचालकांचा सवाल आहे. फायनान्स कंपन्यांच्या Finance companiesया दादागिरीविरोधात अंबरनाथ आणि बदलापूरमधील रिक्षाचालकांनी आज अंबरनाथच्या तहसील कार्यालयाबाहेर बोंबाबोंब आंदोलन केलं. फायनान्स कंपन्यांना सरकारने समज द्यावी आणि आम्हाला कर्ज फेडण्यासाठी वाढीव अवधी मिळावा, अशी रिक्षाचालकांची मागणी आहे.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: लंडनमध्ये युवराज खोपडे यांचा कुस्तीचा डंका

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT