Corona Saam TV
मुंबई/पुणे

Big Breaking: राज्यातील सर्व कोरोना निर्बंध हटवले; मंत्रीमंडळाच्या बैठकीत एकमताने निर्णय

आता राज्यात कोणतेही कोरोना निर्बंध नसणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय.

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : राज्यात असणारे सर्व Corona निर्बंध आता हटवण्यात आले आहेत. हा निर्णय एकमताने घेण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विटद्वारे दिली आहे. महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात आज बैठक सुरु असून कोरोना निर्बंध हटविण्याबाबतचा निर्णय सर्व नेत्यांनी एकमताने घेतला असून येणाऱ्या कोणत्याही सण आणि उत्सहामध्ये कोणत्याही प्रकारचे कोरोना निर्बंध असणार नाहीत असं त्यांनी ट्विटद्वारे सांगितलं आहे.

आव्हाड यांनी ट्विट करताना आता कोणतेही निर्बंध नाहीत आता गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा, रमजान उत्सहात साजरा करा, बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा असा उल्लेखही त्यांनी केला आहे.

राज्यात जवळपास मागील गेल्या दोन वर्षांपासून अनेक निर्बंध लादले होते. त्यामध्ये मास्क (Mask) वापरणं देखील सक्तीचं केलं होतं. मात्र आता मास्कबाबत देखील ऐच्छीक निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नागरिकांना राज्य सरकारने दिलं असून याबाबत खुद्द राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनीच मास्क ची सक्ती नसणार आहे असं सांगितलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT