पुणे - प्रतापगडावरील अतिक्रमण कारवाईनंतर आता सिंहगडावरील (sinhagad fort) असणारी हॉटेलची अतिक्रमण काढण्यास शुक्रवारी पहाटे सुरुवात झाली आहे. यासाठी गडावर दोन जेसीबी, एक डँपर, गॅस कटर अशी यंत्रणा गडावर पोचली आहे. या यंत्रणेकडून वाहनतळवरील हॉटेल (Hotel) वर कारवाईला सुरुवात झाली आहे. सकाळी सात वाजेपर्यंत पाच सहा हॉटेल पाडण्यात आली आहेत.
कारवाई करण्यासाठी वन विभागाची उपवनसंरक्षक यांच्या अखत्यारीत भांबुर्डा, पुणे(हवेली), मुळशी, ताम्हिणी येथील सर्व वनाधिकार्यांनी- वनकर्मचारी गडावर दाखल झाले आहेत यासह पोलिसांचा (Police) विशेष बंदोबस्त देखील यासाठी तैनात करण्यात आलेला आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गड-किल्ल्यावर अतिक्रमण काढण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार कारवाई केली जात असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान याबाबत मंगळवारी गडावरील सर्व खाद्यपदार्थ विक्रेते यांची यांनी नागरिकांची बैठक घेतली. आणि त्यानंतर लवकरच ही कारवाई करणार असल्याची त्यांना माहिती देण्यात आली होती.
यातील काही स्टॉलधारक ३० वर्षांपेक्षा जास्त काळ व्यवसाय करीत आहेत. दरम्यान सिंहगडावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्यामुळे गडावर खाद्यपदार्थ व्यवस्था गडावर असली पाहिजे. त्यामुळे, या हॉटेल व्यावसायिकांचे पुनर्वसन/स्थलांतर केले जाणार आहे. पर्यटन विभागाच्या हद्दीतील जागेत करण्याचे नियोजन आहे.
गडाचा पुणे बाजूचा दरवाजा पहाटे बंद केला आहे. आज कारवाई होणार असल्याची माहिती हॉटेल व्यवसायिकांना होती. त्यामुळे काही जण गुरुवारी रात्री घरी गेले नाहीत. त्यांनी रात्रीच शेड काढून घेतले.
गडावर व्यवसाय करणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांना वन विभागाने पर्यायी व्यवस्था करणार असल्याचे सांगितले आहे. परिणामी अतिक्रमणाला विरोध होणार नाही. परंतु वन विभागाने स्थानिकांच्या रोजगारावर गदा आणू नये. गडाचे संवर्धन होऊन पर्यटन वाढले पाहिजे. हे होत असतां भूमिपुत्रांवर अन्याय होता कामा नये असे माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रेय जोरकर म्हणाले आहे.
उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार गड किल्ल्यावरील अतिक्रमणे काढण्यास आज सुरवात झाली आहे. मोठी तोडफोड करीत नाही. त्या व्यावसायिकांना सयूंक्त वन व्यवस्थापनच्या माध्यमातून त्यांना सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत असे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी सांगितले आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.