Government Jobs 2022 Saam Tv
मुंबई/पुणे

Government Jobs 2022: स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! वैद्यकीय शिक्षण विभागात ४५०० पदांची भरती

Government Jobs 2022: सरळसेवेची गट-ब (अराजपत्रित), गट-क तांत्रिक / अतांत्रिक व परिचऱ्या संवर्गातील सुमारे ४५०० पदे भरण्यात येणार आहे.

वृत्तसंस्था

सुशांत सावंत, मुंबई

Government Jobs 2022: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी खूष खबर आहे. राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत साडेचार हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, आयुष संचालनालय, अन्न व औषध प्रशासन व मानसिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. (Government Jobs In Maharashtra)

मिळालेल्या माहितीनुसार, गट-क तांत्रिक / अतांत्रिक व परिचऱ्या संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदांची (Government Jobs 2022) भरती करण्यात येणार आहे. यासाठी टीसीएस आयओएन या कंपनीमार्फत होणार भरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. सरळसेवेची गट-ब (अराजपत्रित), गट-क तांत्रिक / अतांत्रिक व परिचऱ्या संवर्गातील सुमारे ४५०० पदे भरण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार रिक्त पदे भरण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सांगलीत एक कोटी 11 लाखांच्या बनावट नोटांसह मुद्देमाल जप्त, पाच जणांना अटक

Rukmini Vasanth: 'कांतारा' चित्रपटात आपल्या दमदार अभियनाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री कोण?

Laughing Benefits: हसल्याने आरोग्याला कोणकोणते फायदे होतात माहितीये का?

Maharashtra Politics : शरद पवारांना धक्का, विश्वासू सहकाऱ्यांने केला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुंग्या किती वेळ झोपतात माहितीये का? वेळ ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

SCROLL FOR NEXT