Maharashtra Politics
Maharashtra Politics Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : स्वतःचा TRP वाढवण्याचा खडसेंचा प्रयत्न; 'त्या' व्यक्तव्यावरून रवींद्र चव्हाणांची टीका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजीत देशमुख

Ravindra Chavan On Eknath Khadse : शिंदे - फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत राष्ट्रवादीचे आमदार नेते एकनाथ खडसे यांनी मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास शिंदे व भाजपच्या गोटात असंतोष निर्माण होईल, त्याला तोंड देणं कठीण जाईल म्हणून मंत्रिमंडळ विस्तार होत नाही असा टोला लगावला होता. तसेच मतांना डोळ्यासमोर ठेवून हिंदुत्ववादी मोर्चा काढले जातात असा आरोप केला होता. या आरोपांना भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रत्यूउत्तर दिलं.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत खडसे यांनी केलेलं केलेलं वक्तव्य म्हणजे विरोधाला विरोध. कुठेतरी स्वतःचा टीआरपी वाढला पाहिजे म्हणून काही मंडळी अशी वक्तव्य करत असतात त्यातलच एक वक्तव्य असावं असा टोला भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना लगावला आहे.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे दोन्ही नेते महाराष्ट्राचा प्रत्येक क्षेत्रात एक नंबर कसा होईल त्याला अव्वल दर्जाचे स्थान कसे प्राप्त होईल त्यासाठी काम करत आहेत असे देखील रवींद्र चव्हाण यावेळी म्हणाले.

डोंबिवली पश्चिमेकडील कुंभार खान फाटा गणेश घाट येथे भाजप माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांच्यातर्फे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेचे उद्घाटन अन्नपुरवठा नागरी व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी खडसे यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला .

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga Tips: योगा करताना 'या' चुका टाळा अन्यथा होतील गंभीर परिणाम

Prasad Khandekar Birthday : 'पश्या खूप मोठा हो, यशाचे शिखरं गाठ...' नम्रता संभेरावने दिल्या प्रसाद खांडेकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Pune News: धक्कादायक! क्रिकेट खेळताना गुंप्तांगावर मार लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू, पुण्यातील घटना

Today's Marathi News Live : नवी मुंबईत शिवसेना मनसेची नियोजन बैठक संपन्न

Dehydration Treatment : 'या' ज्यूसचे सेवन केल्याने रखरखत्या उन्हात डीहायड्रेशनपासून राहाल दूर

SCROLL FOR NEXT