Sanjay Raut And Raosaheb Danve Saam Tv
मुंबई/पुणे

“दानवेंना काल काय बोललो ते आज आठवणार नाही”; 25 आमदार संपर्कात असल्याच्या दाव्यावर राऊतांचा टोला

"आम्ही अस बोललो तर तुमचे 50 आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि आहेतच"

जयश्री मोरे

जयश्री मोरे

मुंबई: महाविकास आघाडीचे 25 आमदार राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते. असा दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी धुळवडीच्या दिवशी केला होता. आणि जशा निवडणुका लागतील, तसे ते सर्वजण भाजपात येतील आणि ते आमच्या संपर्कात आहेत. असे वक्तव्य दानवे यांनी काल केले होते. त्याला आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तुमचेच 50 आमदार आमच्या संपर्कात आहे, असे प्रत्युत्तर दिले आहे.

दानवेंना काय म्हणाले संजय राऊत;

"रावसाहेब दानवे यांना जीतके मी ओळखतो, तितके ते भांग पीत नाहीत असे मला माहित आहे, किंवा दुसरी कोणती नशा करत नाहीत. रावसाहेब दानवे यांना कदाचित 125 बोलायचं असेल. स्लीप ऑफ टंग झाली असेल. घ्या ना थांबला कशाला. होळी संपली आहे कालची नशा उतरली असेल. काल काय बोललो हे त्यांना आज आठवणार नाही. आम्ही अस बोललो तर तुमचे 50 आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि आहेतच, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

हे देखील पहा-

काय म्हणाले होते दानवे;

"सत्ताधारी पक्षांचे 25 आमदार मविआ सरकार (MVA Goverment) मध्ये नाराज असून ते आताच्या विधीमंडळ अधिवेशनावर बहिष्कार देखील टाकणार होते. मात्र त्यांची त्यांच्या पक्षनेत्यांनी समजूत घातली आहे. मात्र, त्यांच्या नेत्यांनी आता त्यांची समजूत काढली असली तरीही हे नाराज असलेले 25 आमदार निवडणूक आली की हे नाराज आमदार भाजपच्या वाघोरीत येऊन पडतील असं दानवे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यांने राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ माजली असून ते 25 कोण अशी चर्चा देखील सुरु झाली आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कासा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार,रोहित पवारांनी घेतली पीडितेच्या कुटुंबाची भेट

JIO Recharge : चुकीच्या नंबरवर रिचार्ज झाला तरी नाही होणार नुकसान; कसा मिळेल रिफंड?

BEST Jobs: बेस्टमध्ये काम करण्यांची संधी, 686 कर्मचाऱ्यांची भरती; वाचा सविस्तर...

MSRTC: एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केली तर परवाना रद्द होणार परिवहन मंत्र्यांचा इशारा

West Bengal: पश्चिम बंगालमध्ये राजकीय तणाव वाढला, भाजप कार्यकर्त्यांनी टीएमसी कार्यालयावर बुलडोझर फिरवल्याचा आरोप; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT