Badlapur News Saam Tv
मुंबई/पुणे

बदलापुरात 'रानमेवा' महोत्सव; नागरिकांचा महोत्सवाला चांगला प्रतिसाद

रानातला मेवा थेट शहरात खरेदीसाठी उपलब्ध

अजय दुधाणे

बदलापूर - जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून बदलापूर (Badlapur) शहरात रानमेवा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात रानातला मेवा थेट शहरात उपलब्ध करून देण्यात आला आहे. शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवणारी शेतीजन्य संस्था आणि आमदार किसन कथोरे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा रानमेवा महोत्सव आयोजित करण्यात आला.

हे देखील पाहा -

यामध्ये निरनिराळ्या जातीचे आंबे, जांभळं, करवंदं आणि लोणच्याच्या आंब्यांचा समावेश आहे. हा रानमेवा बदलापूर शहरात फिरत्या पद्धतीने विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या संकल्पनेला बदलापूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. शेकडो नागरिकांनी आदिवासींकडून रानमेवा खरेदी केला.

रविवारीसुद्धा बदलापूर आणि अंबरनाथमध्ये हा रानमेवा महोत्सव होणार आहे. नैसर्गिकरित्या पिकणारा शंभर टक्के सेंद्रीय आणि पौष्टिक रानमेवा आरोग्यासाठी उत्तम असून त्याची विक्री करणाऱ्या मुरबाडमधील आदिवासींना शहरात विक्रीसाठी व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी हा उपक्रम राबवल्याचं आमदार किसन कथोरे यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

विरोधकांनंतर ज्ञानेश कुमारांविरोधात भाजपचे माजी मंत्रीही मैदानात; चोक्कलिंगम यांच्या पत्रानंतर कुमार आणखी अडचणीत

Mumbai News : मुंबई महापालिकेत खळबळ! दोन बड्या अधिकाऱ्यांचा मोठा गेम उघड, लाचखोरीचा गुन्हा

SCROLL FOR NEXT