दिशा सालियान प्रकरणात राणेंच्या अडचणी वाढणार? महापौरांच्या तक्रारीची रुपाली चाकणकरांनी घेतली दखल Saam TV
मुंबई/पुणे

दिशा सालियान प्रकरणात राणेंच्या अडचणी वाढणार? महापौरांच्या तक्रारीची रुपाली चाकणकरांनी घेतली दखल

दिशा सालियान यांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आगोगाकडे केली होती.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महापौर किशोरी पेडणेकर यांचा तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोग (Maharashtra State Women's Commission) कार्यालयास प्राप्त झाला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अक्ष्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी आज दिली आहे. याबाबत ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली.

दिशा सालियान (Disha Salian) या सुशांतसिंग राजपूतच्या पूर्व व्यवस्थापक होत्या. तिच्या मृत्यूबाबत CBI यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला असून मृत्यूपूर्वी तिच्यावर बलात्कार झाला नाही तसंच ती त्यावेळेस ती गरोदर देखील नव्हती, असे तिच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यास तिच्या आईवडिलांनी देखील दुजोरा दिला आहे.

मात्र असे असतानाही केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशा सालियान हिचा बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप केला आहे. ही बाब अतिशय दुर्दैवी व वेदनादायक आहे. त्यामुळे मृत्यूनंतरही दिशा सालियान यांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आगोगाकडे केली आहे.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालवणी पोलीस स्टेशन यांना ४८ तासांमध्ये याचा अहवाल सादर करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून देण्यात आले असल्याची माहिती चाकणकर यांनी दिली.

किशोरी पेडणेकरांनी काय केला होता तक्रार अर्ज -

दिशा सालियान ही सुशांत सिंग राजपूत ह्यांची पूर्व मॅनेजर होती. तिच्या मृत्युनंतर CBI यंत्रणेमार्फत संपूर्ण तपासणी करण्यात आली होती. तसेच तिच्यावर बलात्कार करण्यात आलेला नसून ती गरोदर सुध्दा नव्हती असे तिच्या शवविच्छेदनाच्या अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे . आणि याबाबत तिच्या आई वडीलांनी देखील दुजोरा दिला आहे. मात्र या अनुषंगाने तिची बदनामी होत असल्याने तिच्या आई वडीलांनी पोलीस स्थानकात तक्रार केली असून त्यांचा पोलीस यंत्रणेवर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तरीही माननीय सुक्ष्म मध्यम उद्योग मंत्री श्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन वारंवार तिच्यावर बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप करीत आहेत. श्रीमती दिशा सालियान हिच्या मृत्युनंतर तिच्याबाबत राजकीय नेत्यांकडून प्रसार माध्यमातून चुकीचे आरोप करण्यात येत असून आई-वडीलांकरिता ही अतिशय दुर्दैवी व वेदनादायक बाब आहे. दिशा मालियान हिच्या मृत्युपश्चात तिला हत्यार करुन राजकीय आरोप होत आहे व तिची बदनामी करण्यात येत आहेत ती तात्काळ थांबविणे गरजेचे आहे. हयास्तव बदनामी करणा-यांवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी असा अर्ज किशोरी पेडणेकर यांनी केला होता.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalsutra Paan Design: वटपोर्णिमेसाठी ट्राय करा पानाचे सुंदर मंगळसूत्र, पाहा या ७ ट्रेंडी डिझाइन्स

Crime: अमरावती हादरले! बहिणीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला, भरचौकात धारदार शस्त्राने वार करत तरुणाला जागीच संपवलं

Vidhan Parishad Election: राज्यभरात विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी; कुठे बिनविरोध, कुठे होणार लढत

Monsoon Update 2026 : मान्सून सर्वात शेवटी कोणत्या राज्यात पोहोचतो? कारण जाणून घ्या

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये डोमेस्टिक गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराचा पर्दाफाश; 251 सिलेंडर जप्त

SCROLL FOR NEXT