नवाबभाई रियाझ भाटी नक्की कोणाचा? पवार, ठाकरेंसोबतचे फोटो राणेंनी केले ट्विट @NiteshNRane/ SaamTV
मुंबई/पुणे

BJP vs MVA : नवाबभाई रियाझ भाटी नक्की कोणाचा? पवार, ठाकरेंसोबतचे फोटो राणेंनी केले ट्विट

'देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या व्यक्तींची सरकारी पदांवर वर्णी लावली.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई - दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) माणूस रियाझ भाटी (Riaz Bhati) याच्यासोबत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे संबंध असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या व्यक्तींची सरकारी पदांवर वर्णी लावली. फडणवीस सरकारच्या काळात गुन्हेगारांना संरक्षण देण्यात आलं. राजकारणाचं गुन्हेगारीकरण करण्याचं काम फडणवीसांनी केलं असे गंभीर आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला होता. (Rane tweeted a photo with Pawar and Thackeray)

मलिकांच्या या आरोपामुळे भाजपनेते प्रचंड आक्रमक झाले असून मलिकांच्या विरोधात ठिकठीकाणी आदोलन देखील भाजपने केली आहेत. अशातच करणारे भाजपा आमदार नितेश राणे Nitesh Rane यांनी रियाझ भाटीचे शरद पवार आणि उद्धव ठाकरे (Sharad Pawar and Uddhav Thackeray) सोबत असनारे फोटो आपल्या ट्विटरवरुन शेअर करत मलिकांना प्रतिसवाल केला आहे.

नितेश राणेंनी आपल्या ट्विटमध्ये रियाझ भाटीचे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आणि विचारले की, नवाबभाई म्हणतात की, रियाझ भाटी हा दाऊदचा माणूस आहे. पण त्यांना म्हणायचे काय आहे, असा सवाल नवाब मलिक यांना नितेश राणेंनी विचारला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

SCROLL FOR NEXT