किशोरी पेडणेकर Saam Tv
मुंबई/पुणे

राणा जोडपं पंतप्रधानांची जागा घ्यायला बघत आहे - किशोरी पेडणेकर

नवनीत राणा यांना केंद्राच्या वतीने Y सुरक्षा दिल्या नंतर त्यांना असे वाटू लागले आहे की संपूर्ण देशात आणि राज्यात राज करू शकते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण शिंदे

मुंबई - अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना केंद्राच्या वतीने Y सुरक्षा दिल्या नंतर त्यांना असे वाटू लागले आहे की संपूर्ण देशात आणि राज्यात राज करू शकते. तसेच प्रसिध्दी साठी मातोश्री आणि सेना भवन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर बोलले जात आहे. पंतप्रधान यांची जागा घेण्यासाठी देखील राणा कंपनी बघत आहेत असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

हे देखील पहा -

पुढे पेडणेकर म्हणाल्या की, कालचा उत्तर कोल्हापूरचा निकाल ऐकून फार आनंद झाला. मी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करते. महा विकास आघाडी सरकारची ताकद ही कालच्या निकालावरून स्पष्ट झाली आहे. चंद्रकांत पाटील आधी स्वतः म्हणाले होते की, जर निकाल आमच्या विरोधात लागला तर मी हिमालयात निघून जाईन मग आता कोणी अढवल आहे त्यांनी हिमालयात जावे अशी खोचक टीका किशोरी पेडणेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे.

पुढे किरीट सोमय्या यांच्या विषयी बोलताना किशोरी पेंडेंकर म्हणाल्या की, हा कायदेशीर विषय आहे. न्यायालयात प्रत्येक वेळी त्यांच्या बाजूने निकाल लागतात. यामुळे शंकेची पाल चुकचुकली. पण चित्र नक्की स्पष्ट होईल असे देखील पेडणेकर यावेळी म्हणाल्या.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT