Shivsena Bhavan Saam TV
मुंबई/पुणे

मनसेने शिवसेनेला डिवचले, रामनवमी निमीत्त सेना भवनासमोर लावली हनुमान चालीसा

राज ठाकरेंनी (Raj Thackeray) दिलेली शिवाजी पार्कवरुन (Shivaji Park) दिलेली हाक कुठेतरी कार्यकर्ते पाळताना दिसत आहेत.

साम टिव्ही ब्युरो

भूषण शिंदे

मुंबई: राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या भाषणानंतर मनसेवरती काही प्रमाणात टीका झाली. राज ठाकरेंच्या भोंग्यांच्या भूमिकेवरुन पक्षातील आणि राज्यातील मुस्लीम समाज नाराज झाला आहे. पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामेही दिले आहेत. आज तर मनसेने (MNS) थेट शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. मनसेने आज रामनवमी निमीत्त शिवसेनेचे मुख्यालय असलेल्या 'शिवसेना भवनास'मोर लाऊडस्पीकर लावले आहेत.

राज ठाकरेंनी (Raj Thackeray) दिलेली शिवाजी पार्कवरुन (Shivaji Park) दिलेली हाक कुठेतरी कार्यकर्ते पाळताना दिसत आहेत. मनसेने लाऊडस्पीकरवरती हनुमान चालीसा लावली होती. आणि तीही शिवसेना भवनासमोर. त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून पोलिसांनी मनसेचे लाऊडस्पीकर जप्त करत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान राज ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील भाषण चांगलंच वादग्रस्त ठरलं होते. पक्षातीलच पदाधिकारी या वक्तव्याने नाराज झाले होते. अनेक ठिकाणी राज ठाकरेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला होता. पुण्यातील मनसेचे माजी शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरेंचा आदेश न पाळल्याने शहर अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले होते. त्याचबरोबर राज्यभरातून अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. काही मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याला समर्थन केले होते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reetha- Shikakai Hairpack: केस गळण्याची समस्या झटक्यात होईल दूर, एकदा लावून पाहा रिठा- शिकेकाईचा हेअर पॅक, घरी बनवण्याची पद्धतही सोपी

Maharashtra News Live Update: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत?

Alia Bhatt: आलिया भट्टचा ग्लॅमरस 'ड्रिमी बार्बी' लूक पाहून चाहते फिदा; कान्समधील फोटो तुफान व्हायरल

New Labour Code: नवीन कामगार कायदा लागू; पगारापासून ते PF वर होणार परिणाम; वाचा सविस्तर

Famous Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, सिनेसृष्टी शोक सागरात बुडाली

SCROLL FOR NEXT