ram kadam
ram kadam 
मुंबई/पुणे

ही शिवसेना नव्हे, साेनिया सेना; दहीहंडी हाेणारच : राम कदम

जयश्री मोरे

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राम कदम यांनी परंपरेप्रमाणे दहीहंडी साजरी करणारच असा विश्वास आज येथे व्यक्त करीत राज्याचे गृहमंत्र्यांनी आम्हांला घाटकाेपर ghatkopar पाेलिस ठाण्यात दहीहंडीची dhai handi परवानगी घेण्यासाठी जाऊन द्यावे अशी मागणी माध्यमातून केली. कदम mns leader ram kadam यांनी दहीहंडी dhai handi 2021 साजरी करणारच हा निर्धार केल्याने त्यांच्या निवासस्थाना बाहेर मुंबई पाेलिसांनी बंदाेबस्त ठेवला आहे. त्यांना स्थानबद्ध करण्याचा हा प्रयत्न असल्याचे कदम यांचे म्हणणे आहे. दरम्यान शिवसेना shivsena ही हिंदू विराेधी वागत असून ती आता साेनिया सेना झाल्याची टिका राम कदम यांनी सेनेवर केली आहे.

राम कदम यांच्या निवासस्थानी कृष्ण आणि राधा यांच्या वेषभुषेत गोपाळ आले आहेत. राज्य सरकारने दहीहंडीसाठी परवानगी दिली तर ठीक अन्यथा मी घाटकोपरला जाणारच असा चंग कदमांनी बांधला. ते म्हणाले परंपरेप्रमाणे आम्ही दहीहंडी उत्सवाचे आयाेजन केले आहे. परंतु आमच्या निवासस्थाना बाहेर पाेलिसांनी वेढा घालून येणा-या गाेविंद पथकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. हा प्रकार हिंदु सणांना विराेध करणा-या ठाकरे सरकारमुळं घडत आहे.

या दहीहंडीचा महाराष्ट्र सरकार मान करणार, सन्मान करणार का नेहमी प्रमाणे हिंदू सणांचा द्वेष करते तसं करणार हे पाहू या. त्यांनी जरी काही केले तरी आम्ही सण साजरा करणारच. येथे कृष्ण आणि राधा आले आहेत. हा हिंदूचा सण आहे. आम्ही म्हणत नाही गर्दी करुन सण साजरा करा. आम्ही फक्त पाच जणांसाठी परवानगी मागत आहाेत. यावेळी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना कदम यांनी घाटकाेपर पाेलिस स्थानकात जाण्यासाठीची मागणी केली.

ते म्हणाले घराच्या खाली गाेविंद पथकांना पाेलिस बळाचा वापर करीत राेखले आहे. ठाकरे सरकारला माेगलाई करता येणार नाही. सरकारने कितीही विराेध केला तरी दहीहंडी ही हाेणाराच असा विश्वास राम कदम यांनी व्यक्त केला. काल आम्ही मंदिरात निघालाे त्यावेळेस अडविले. बिअर बार, दारुच्या दुकानांसाठी नियम केले तसेच दाेन लस घेतलेल्या भाविकांसाठी नियम करा अशी मागणीही कदम यांनी केली.

भाविकांना दर्शनासाठी वंचित ठेवणारे तुम्ही काेण असा प्रश्न कदम यांनी ठाकरे सरकारला केला आहे. हप्ता वसूलीसाठी काेण नवा वाजे आला आहे हे पहावे लागेल. पाच जणांनी एकत्र येऊन दहीहंडी केली तरी ठाकरे सरकारला काय अडचण आहे.

अन्य धर्मातील लाेकांनी सणांसाठी परवानगी मागितल्यास त्यांच्यासाठी मध्यरात्री मंत्रालय उघडले जाते आणि त्यांना परवागी दिली जाते. ज्या वेळेस हिंदु केवळ पाच जणांसाठी परवानगी मागत आहेत तर त्यांच्या निवासस्थाना बाहेर हजाराे पाेलिसांचा फाैजफाटा तैनात केला जाताेय. ही माेगलाई आहे नाही तर अजून काय असा प्रश्न राम कदमांनी उपस्थित केला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्पोर्टी लूक अन् जबरदस्त फीचरसह Mahindra XUV 3XO लाँच; किंमत दहा लाखांपेक्षा कमी

Today's Gold Silver Rate : खरेदीची सुवर्णसंधी! सलग तीन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण, मुंबई-पुण्यात आजचा भाव किती?

Amravati News : पोलिसांची नजर चुकवत आरोपी फरार; जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी होता दाखल

Today's Marathi News Live : दादर पूर्वमधून १.१४ कोटींची रोकड जप्त

Divorce: नवऱ्याने तोंडाला केक लावल्याने नवरी भडकली; लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घटस्फोट

SCROLL FOR NEXT