holi festival  saam tv
मुंबई/पुणे

Holi Festival : अखेर हिंदु विराेधी मविआ सरकारने गुडघे टेकले : राम कदम

जयश्री मोरे

मुंबई : तीन पक्षांच्या सरकारला (mva) हिंदूच्या सणाचा द्वेष का आहे हेच आम्हांला समजत नाही. हाेळी सण (holi festival) हा राज्यातील विविध भागात माेठ्या उत्साहात साजरा केला जाताे. परंतु सरकारला निर्बंध लावण्यातच स्वारस्य असल्याचे दिसते. अरे घाबरत तुम्ही असाल आम्ही नाही. ज्या वेळेस त्यांच्या भाषेत आम्ही त्यांना सांगितले तेव्हा त्यांनी हिंदू समाजाची माफी मागत सणांना परवानगी दिल्याचे भाजप (bjp) नेते राम कदम (ram kadam) यांनी नमूद केले. (Holi Festival Latest Marathi News)

राम कदम यांच्या निवासस्थानाबाहेर उत्सव जल्लोषात होळी (रंगपंचमी) सण साजरा करण्यात आला. यावेळी सरकारच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात आली. राम कदम यांनी सपत्नीक होळीची पुजा करून महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी सरकारचे प्रतिकात्मक हाेळी केली.

राम कदम म्हणाले आम्हांला आमच्या जिवाची कशा पद्धतीने काळजी घ्यायचे हे समजते. तुम्ही घरात बसून आम्हांला सांगू नये. गेल्या २८ महिन्यांत केवळ वसूली आणि वसूली एवढेच आपल्याला दिसले. त्यामुळेच आज ही (सरकारच्या भ्रष्टाचाराची) हाेळी केली. भाजपने नुकतेच विधानसभा निवडणुकीत भरघाेस यश मिळविले आहे. आगामी निवडणुकांमध्ये माेदी सरकार (narendra modi) आपली छाप उमटवेल आणि सन २०२४ च्या निवडणुकीत माेदींच्या नेतृत्वाखाली लाेकसभेत माेदी सरकार (prime minister narendra modi) येईल असा विश्वास राम कदम यांनी व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime : विहिरीत कासव पाहायला सांगितलं, नंतर ३ शाळकरी विद्यार्थ्यांना ढकलून दिलं; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

Yogita Chavan: 'क्या खूब लगती हो...', सोज्वळ अंतराचा कातिलाना अंदाज

IND vs BAN: सिराज भडकला ना राव! रोहित अन् रिषभला मागावी लागली माफी; नेमकं काय घडलं?- VIDEO

Maharashtra News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ उद्या बीड बंदची हाक

Ajit Pawar : अजितदादा विधानसभेत वापरणार मुस्लिम कार्ड !

SCROLL FOR NEXT