राजीव सातवांच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक; 'या' नेत्यांची नावं चर्चेत Saam Tv
मुंबई/पुणे

राजीव सातवांच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक; 'या' नेत्यांची नावं चर्चेत

रिक्त झालेली जागेची पोटनिवडणूकीसाठी (By-Election) अर्ज भरण्याची आणि मागे घेण्याची तारीख निवडणूक आयोगाकडून जाहिर करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई: काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांचे १६ मे रोजी निधन झाले. त्यानंतर रिक्त झालेली जागेची पोटनिवडणूकीसाठी (By-Election) अर्ज भरण्याची आणि मागे घेण्याची तारीख निवडणूक आयोगाकडून जाहिर करण्यात आली आहे. अर्ज करण्याची तारीख २२ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० पर्यंत असणार आहे. हा अर्ज महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे द्यावा लागणार आहे. आलेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी २३ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजता मुंबईत होणार आहे.

27 सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. जर निवडणूक लढविली गेली तर दिनांक ४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यंत मतदान होणार आहे. काँग्रेसकडून ओबीसी प्रश्न ऐरणीवर असल्याने ओबीसी उमेदवार देण्याची मागणी करण्यात येत आहे.

काँग्रेसमधून या नेत्यांची नावं चर्चेत आहेत.

रजनी पाटील

मुकुल वासनिक

राजीव शुक्ला

प्रज्ञा सातव

गुलाब नबी आझाद

मिलिंद देवरा

दरम्यान १६ मे रोजी राजीव सातव यांचं निधन झालं होतं. तेव्हापासून राज्यसभेची जागा रिक्त होती. राजीव सातवांना राहूल गांधींचे निकटवर्तीय समजले जात होते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

Maharashtra Monsoon Session: विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

SCROLL FOR NEXT