Breaking : अन्यथा ST कर्मचाऱ्यांचा असंतोषाचा उद्रेक होईल; राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्याना पत्र SaamTV
मुंबई/पुणे

Breaking : अन्यथा ST कर्मचाऱ्यांच्या असंतोषाचा उद्रेक होईल; राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्याना पत्र

राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कोरोना संकटकाळात जनसेवेची सर्वोत्तम कामगिरी बजावूनही आर्थिक समस्यांमुळे हताश झालेल्या 30 पेक्षा अधिक ST कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या असून ST महामंडळाला राज्य शासनात विलीन करा' ही एसटी कर्मचान्यांची प्रमुख मागणी मान्य करण्याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनेक आगारांमधील काम ठप्प आहे. ज्या आगारांमध्ये काम सुरु आहे, तिथेही असंतोष खदखदत आहेच.

हे देखील पहा -

अशातच ऐन दिवाळीत कर्मचाऱ्यांना (To employees) सेवा समाप्ती कारवाई करण्यात येईल अशा नोटिसा ST महामंडळाने बजावल्या आहेत. दबावतंत्राचा अवलंब करून कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्यात येत आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना उशिरा मिळणारे पगार आणि त्यामुळे त्यांना करावा लागणारा आर्थिक समस्येमुळे कर्मचारी टोकाचं पाऊल उचलत आहेत. अशातच महामंडळाच्या गैरकारभारामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झालेला अविश्वासामुळे त्यांच्यातील असंतोष वाढत आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेण्याची वेळ असून 'तो जगला तर एसटी जगेल' अशा आशयाच पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) लिहल आहे.

तसेच ST महामंडळाचे (ST Corporation) राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई करु नये. अन्यथा, कर्मचारी कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल. असा इशारा देखील त्यांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना दिला आहे. तसेच माझ्या या मागणीचा आपण गांभीर्यपूर्वक विचार कराल आणि योग्य ते आदेश परिवहन मंत्री तसंच महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना द्याल, हीच अपेक्षा असल्याचही त्यांनी या पत्रात लिहलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TMKOC Fame Jheel Mehta: कोण आहे भिडेंचा जावई? 'तारक मेहता' फेम सोनू लवकरच अडकणार लग्नबंधनात; तारीखही ठरली

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

Devendra Fadnavis : सत्तास्थापनेसाठी शरद पवारांसोबत चर्चा, बैठकीला अदानी नव्हते; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

Assembly Election 2024: १५८ पक्ष विधानसभेच्या रिंगणात, भाजप तिसऱ्या क्रमांकावर, सर्वाधिक जागा कोण लढवतंय?

Sugarcane Juice: उसाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे!

SCROLL FOR NEXT